शरद पवार यांना राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाकडून स्तुत्य उपक्रम राबवून वाढदिवसाची भेट

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाचे पुणे शहराचे अध्यक्ष विजय डाकले यांनी नायगांव येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य संरक्षित स्मारकाची देखभाल, साफसफाई, सुरक्षा याची जबाबदारी ( दायित्व ) घेतली आहे. १२ डिसेंबर रोजी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या स्मारकाच्या परिसराची स्वच्छता व साफसफाई करून शरद पवार यांचा वाढदिवस एका स्तुत्य उपक्रमाद्वारे साजरा केला.

स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रबार्इ फुले यांचे स्मारक देखभालीसाठी मिळावे यासाठी पुरातत्व विभागाला तशा प्रकारचा प्रस्ताव विजय डाकले यांनी दिला होता. या प्रस्तावाला नुकतीच मान्यता मिळाली. परवाणगी मिळाल्याने या संरक्षित स्मारकाचे सर्व ते प्रकारचे साफसफाई , सुरक्षा यांच्या खर्चासह सर्व दायित्व यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग पुणे शहर यांच्याकडे राहणार आहे. एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबवून विजय डाकले आणि सामाजिक न्याय विभागाने साहेबांना वाढदिवसाची आगळी वेगळी भेट दिली आहे.



आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी स्मारकाची साफ सफाई स्वच्छता केली. प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन झाल्यानंतर वाढदिवसाचा केक कापुन साहेबांचा वाढदिवस साजरा केला गेला. साहेबांचा वाढदिवस अशा पवित्र ठिकाणी करण्याचा योग आल्याने सर्वांनी आनंद व्यक्त केला. यावेळी अनेकांनी मनोगत व्यक्त केले व साहेबांना दिर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी विजय डाकले, माणिकशेठ दुधाने, गोविंद थरकुडे, आनंद तांबे, चारुदत्त घाडगे, संजय खोपडे, बाजीराव मासाळ, निलेश माझिरे, सचिन डाकले, अजित घस्ते ,वैजनाथ वाघमारे, अशोक जाधव, शंकर तेलंगे, संजय चव्हाण, विनोद शिंदे, अमोल गायकवाड, ऋषीकेष कांबळे आदी उपस्थित होते.






