महाराष्ट्र

सिंधुदुर्ग समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या पुण्याच्या 4 मुलींचा मृत्यू, 1 मुलगा बेपत्ता

सिंधुदुर्ग : देवगड समुद्र किनाऱ्यावर मोठी दुर्घटना घडली आहे. पर्यटनासाठी आलेले पाचं पर्यटक बुडालेत. यामधील चौघांचे मृतदेह मिळाले तर एक जण बेपत्ता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व पर्यटक पुणे येथील खासगी सैनिक अकॅडमीचे विद्यार्थी आहेत. मृत्यू झालेल्यामध्ये चार मुलींचा समावेश आहे, तर एक मुलगा बेपत्ता आहे.

दुपारी तीन ते चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.  पिंपरी चिंचवड येथील सैनिक अकॅडमीची 35 जणांची सहल देवगड येथे आली होती. समुद्रात आंघोळीसाठी पाच जण उतरले होते. त्यावेळी पाचजण बुडाले आहेत. सर्व मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मृतांमध्ये प्रेरणा डोंगरे, अंकिता गालटे, अनिशा पडवळ, पायल बनसोडे यांचा समावेश आहे. तर राम डिचोलकर बेपत्ता आहे.

Img 20231109 wa0012281291226259195260975368

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील देवगड समुद्र किनारी पर्यटनासाठी पिंपरी चिंचवड येथील सैनिक अकॅडमीची ३५ जणांची सहल आली होती. समुद्र किनाऱ्यावर पोहचल्या नंतर आघोळ करण्याचा मोह पर्यटकांना आवरला नाही. त्यामूळे या गृपमधील काही जण समुद्रात आघोळीसाठी गेले. यातील पाच जण समुद्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले. यात चार मुली आणि एक मुलगा होता. चौघांचे मृतदेह मिळाले तर एक जण अजूनही बेपत्ता आहे. या घटनेची माहिती मिळण्यास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्यासह पोलीस सहकारी , तहसीलदार रमेश पवार नगराध्यक्ष साक्षी प्रभू घटना स्थळी दाखल झाले.

Img 20230717 wa0012281294586790481769091554

पुणे येथील पिंपरी चिंचवड येथील सैनिक अकॅडमीची ३५ जणांची सहल देवगड येथे आली होती. यातील पाच जण समुद्रात बुडाले. त्यापैकी चौघा मुलींचे मृतदेह सापडले असून एक विद्यार्थी बेपत्ता आहे. हि घटना दुपारी तीन ते चार वाजण्याच्या सुमारासची आहे. सर्व मृतदेह देवगड ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहेत. यात मृतांमध्ये प्रेरणा डोंगरे, अंकिता गालटे, अनिशा पडवळ, पायल बनसोडे यांचा समावेश आहे. तर राम डिचोलकर अजूनही बेपत्ता असून पोलिस स्थानिकांच्या मदतीने शोध घेत आहेत.

Img 20230511 wa0002282292722773256594657904
Img 20221228 wa0001281293906176097910423568496031457580102742

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये