पुणे शहर

कर्वेनगर मध्ये हाकेला धावून जाणारा हक्काचा माणूस म्हणून माझी ओळख, त्यामूळे विजयाचा पूर्ण विश्वास – राजाभाऊ बराटे 

प्रभाग क्रमांक 30 कर्वेनगर होम कॉलनी मध्ये भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रचार रॅली 

पुणे :  कर्वेनगर भागामध्ये मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी केलेली लोकांची कामे, अनेक प्रश्न सोडविले.कर्वेनगर मध्ये हाकेला धावून जाणारा हक्काचा माणूस हणून माझी ओळख आहे. या निवडणूकीत नागरिक माझ्या पाठीशी ठामपणे उभे आहेत.त्यामूळे विजयाचा पूर्ण विश्वास आहे .असे मत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राजाभाऊ बराटे यांनी व्यक्त केले आहे.

प्रभाग क्रमांक 30 कर्वेनगर होम कॉलनी मधील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राजाभाऊ बराटे, सुशील मेंगडे, तेजश्री पवळे, रेश्मा बराटे यांच्या प्रचारासाठी कर्वेनगर भागामध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रचारयात्रे मध्ये राजाभाऊ बराटे बोलत होते.

Img 20251125 wa01782121520512185783132

राजाभाऊ बराटे म्हणाले, मी 15 वर्षे या भागामध्ये नगरसेवक म्हणून कार्यरत आहे. मी अनेक विकासाची कामे या प्रभागात केली आहेत.या प्रभागातील प्रत्येक नागरिकांशी माझा चांगला संपर्क आहे . त्यामूळे लोकांना मी त्यांच्या हक्काचा माणूस वाटतो. पदयात्रा, भेटी गाठी यामधून मी लोकांशी संवाद साधत असताना मला नागरिक देत असलेला प्रतिसाद पाहून मला विजयाची पुर्ण विश्वास आहे.विकासाच्या मुद्द्यांवर भाजप उमेदवार मी राजाभाऊ बराटे, सुशील मेंगडे आणि तेजश्री पवळे, रेश्मा बराटे यांना विजयी करावे असे मी आवाहन करतो.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये