कर्वेनगर होम कॉलनी प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचे रॅलीव्दारे जोरदार शक्ती प्रदर्शन

प्रभाग क्रमांक 30 कर्वेनगर हिंगणे होम कॉलनी स्वप्नील दुधाणे, विजय खळदकर, संगिता बराटे, निवेदिता जोशी यांच्या प्रचारार्थ जोरदार शक्ती प्रदर्शन करीत प्रचार रॅली
पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात प्रभाग क्रमांक ३० (कर्वेनगर- होम कॉलनी) मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार स्वप्निल दुधाणे, विजय खळदकर, संगीता बराटे आणि निवेदिता जोशी यांच्या प्रचारार्थ प्रभागातून काढण्यात आलेल्या रॅलीला उत्स्फूर्त मिळाला. आजच्या शेवटच्या प्रचार रॅलीने कर्वेनगर भागातील राजकीय वातावरण ढवळून निघाले.
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी प्रभाग क्रमांक 30 कर्वेनगर हिंगणे होम कॉलनी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असलेले स्वप्नील दुधाने, विजय खळदकर, संगिता बराटे, निवेदिता जोशी यांच्या रॅलीच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन केले.

रॅलीनंतर बोलताना स्वप्निल दुधाने म्हणाले, “आम्ही केलेल्या विकासकामांमुळे कर्वेनगरचे मतदार आमच्या पॅनलला साथ देतील.” केलेले रस्ते, पाणीपुरवठा व्यवस्था, क्रीडा सुविधा आणि इतर मूलभूत सोयींमध्ये केलेल्या कामांचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. कर्वेनगरमध्ये ए पी जे अब्दुल कलाम ई लर्निंग स्कूल, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल, शहीद भगतसिंग वाचनालय, तसेच योगा हॉल, धनुर्विद्या क्रीडा संकुलासारख्या प्रकल्पांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
कर्वेनगर भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मानणारा मोठा वर्ग आहे. माझी आई या भागात 10 वर्षे नगरसेविका होती. या कालावधीत आम्ही या भागात विविध विकासाचे प्रकल्प पुर्ण केले आहेत. तसेच नागरिकांचे अनेक प्रश्न सोडविले आहेत. यामुळे नागरिक आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पॅनलच्या पाठीशी आहेत. कर्वेनगर होम कॉलनी प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजयी होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विजय खळदकर व संगीता बराटे म्हणाल्या, विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून आम्ही नागरिकांपर्यंत पोहचलो आहोत, गेली अनेक वर्ष या भागात सामाजिक काम करत असल्याने नागरिकांना अपेक्षित विकास साधण्याचा आमचा प्रयत्न असणार असून आम्हाला सर्वच स्थारारतून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने विजयाची खात्री आहे.



