चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त कर्वेनगरमध्ये आयोजित आरोग्य शिबिरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : समर्थ युवा फाउंडेशन यांच्या माध्यमातून व , उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कर्वेनगर मधील विकास मित्र मंडळ चौकामध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये होणाऱ्या विविध आरोग्य तपासणी शिबिरात पहिल्या दिवशी 189 नागरिक सहभागी झाले होते.
या शिबिरात 1. स्तनांचा कर्करोग तपासणी 2. तोंडाचा कर्करोग तपासणी 3. डोळे तपासणी 4. दातांची तपासणी 5. रक्त तपासणी 6. साधारण आरोग्य तपासणी 7. रक्तदाब तपासणी 8. रक्तातील घटकांची तपासणी 9. कोलेस्टेरॉल तपासणी 10. रक्तातील साखर तपासणी करण्यात येत आहे. आज १० व उद्या ११ जून २०२४ रोजी दुपारी १२ ते सायं. ८.३० वाजेपर्यंत ही तपासणी सुरू राहणार आहे. अशी माहिती भाजप कोथरूड विधानसभा सरचिटणीस विठ्ठल बराटे यांनी दिली आहे.

आयोजक माजी नगरसेवक राजाभाऊ बराटे, युवा मोर्चा संपर्कप्रमुख ऋषिकेश बराटे, हेमंत बोरकर, विशाल रामदासी, राजीव मोरे उपस्थित होते.
विठ्ठल बराटे म्हणाले, समर्थ युवा फाउंडेशन आणि मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त नागरिकांसाठी आयोजित शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. उद्या दुसऱ्या दिवशी देखील नागरीकांना शिबिरात सहभागी होऊन तपासणी करता येणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे.

































