पुणे शहर

कर्वेनगर,वारजे मध्ये पुस्तक घरच्या माध्यमातून वाचन चळवळीला प्रारंभ ; लक्ष्मी दुधाने यांचा पुढाकार

कर्वेनगर : जीवनात प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त करायचे असेल तर पुस्तक वाचनाशिवाय पर्याय नाही.  वाचनाने माणूस सर्वगुण संपन्न बनतो. राजकीय क्षेत्रात काम करताना ही पुस्तक वाचन महत्वाचं आहे. असे मत महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आणि  साहित्यिक, विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. Start a reading movement through the book house;  Initiative of Corporator Lakshmi Dudhane

कर्वेनगर-वारजे परिसरातील नागरिकांमध्ये वाचन चळवळ सुरु करण्यासाठी नगरसेविका लक्ष्मी दुधाने व राष्ट्रवादी काँग्रेस चे कोथरुड मतदार संघाचे अध्यक्ष स्वप्नील दुधाने यांच्या प्रयत्नातून कर्वेनगर राजाराम पुल मातोश्री वृद्धाश्रमा शेजारी सुरू करण्यात आलेल्या पुस्तक घर या उपक्रमाचे उद्घाटन मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेविका लक्ष्मी दुधाने ओपन लायब्ररी मुव्हमेंटच्या अध्यक्षा प्रियंका रंजना रामराव चौधरी, लेखक वी.दा. पिंगळे, स्वप्नील दुधाने, आनंद तांबे, प्रमोद शिंदे, पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील नागरिक यावेळी उपस्थित होते.

Img 20210522 wa0203

मोरे म्हणाले, डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे वाचन अफाट  असल्यानेच ते महान कार्य करू शकले. त्यांच्या राजगृह या घराची रचनाही त्यांनी पुस्तक वाचनालय डोळ्यासमोर ठेऊन केली होती. राजकीय क्षेत्रातही महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनाही वाचनाची आवड होती.  लोकांमध्ये पुन्हा वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी लक्ष्मी दुधाने व स्वप्नील दुधाने यांनी राबवलेली पुस्तक घर ही संकल्पना कौतुकास्पद आहे. 

स्वप्नील दुधाने म्हणाले, आजच्या सोशल मीडियाच्या काळात तरुण पिढी पुस्तक वाचनापासून दूर जातीये की काय असे वाटू लागले आहे. पुस्तक वाचन हे जीवनाला समृध्द करते त्यामुळे पुस्तक घर च्या माध्यमातून आम्ही वाचन चळवळ सुरू करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे व त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

वाचन चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी व आपल्या सर्वांच्या ज्ञानात भर पाडण्यासाठी घरातील वाचलेली जुनी पुस्तके या पुस्तक घरात आणून द्या आणि याठिकाणी उपलब्ध असलेली नवीन पुस्तके मोफत वाचनाकरिता घेऊन जा असे आवाहन दुधाने यांनी यावेळी केले.

Img 20210619 wa0147

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये