पुणे शहर

पेरिविंकल शाळेच्या कोविड वॉरियर्सचा सांगली व सोलापूरच्या तहसीलदारांकडून सन्मान


पुणे : चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लीश मिडीयम स्कूल च्या बावधन शाखेत टीचर्स ओरियेंटेशन मीटिंग चे औचित्य साधून सर्व शिक्षकांना कोविड वॉरियर्स म्हणून सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रयोजनच शिक्षकांचा प्रशस्तिपत्रक देऊन सन्मान करणे होते.

कार्यक्रमाची सुरवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. यावेळी विटा- सांगलीचे तहसीलदार ऋशिकेश शेळके, माढा सोलापूरचे तहसीलदार राजेश चव्हाण, प्रसिध्द उद्योगपती अरुण शिंदे,संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल, संस्थेच्या संचालिका  रेखा बांदल, शाळेच्या मुख्याध्यापिका नीलिमा व्यवहारे, रुचीरा खानविलकर , निर्मल पंडित  आदी मान्यवर उपस्थित होते.

Img 20210522 wa0203

           मागील संपूर्ण वर्षात कोविड-19 मुळे संपूर्ण जग जरीही थांबले असले तरीही सर्व शिक्षकांनी  ज्ञानदानाचे हे पवित्र कार्य कुठेही न थांबता अविरतपणे सुरू ठेवले. तसेच सर्व विद्यार्थ्याना अशा परिस्थितीत शिक्षणापासून वंचित राहू न देता अभ्यासात गुंतवून ठेऊन वेळोवेळी ऑनलाइन पध्तीने योजीलेल्या सरावपरीक्षा,सण, ऑनलाइन कार्यक्रम, ऑनलाइन स्पर्धा यात सहभागी होण्यास प्रोत्साहीत केले.शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करत हे संपूर्ण वर्ष ऑनलाइन पद्धतीचे शिक्षण असल्यामुळे विद्यार्थ्याच्या सतत ऑनलाइन संपर्कात राहून हे शैक्षणिक वर्ष हसत खेळत  विनातक्रार पार पाडले.

त्यामुळे डॉक्टर, नर्स, पोलीस यांचा कोविड योद्धा म्हणून जेवढा सहभाग आहे तेवढाच सहभाग शिक्षकांचा देखील आहे हे जाणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल व संचालिका रेखा बांदल यांच्या प्रेरणेतून पेरिविंकल शाळेच्या बावधन शाखेत सर्व उपस्थित शिक्षकांचा अविरत कार्याबद्दल प्रशस्तीपत्रक देऊन तहसीलदार ऋषिकेष शेळके, राजेश चव्हाण , अरुण शिंदे , संस्थेचे संस्थापक राजेंद्र बांदल संचालिका रेखा बांदल आदी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

Img 20210619 wa0147

      तसेच शिक्षकेतर कर्मचारी ज्यांनी वर्षभर अविरत पणे शिक्षकांना मदत करण्याचे व स्वच्छता राखण्याचे काम केले अशा काका मावशीचा ही प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी पेरिविंकल चा हा चढता आलेख जोमाने वाढत असल्याचे श्रेय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यांनी येथील तज्ञ शिक्षकांचे अचूक मार्गदर्शन, सर्व पालक वर्गाचा असलेला संस्थेबद्ल विश्वास व विद्यर्थ्यँचे मेरिट या सर्वांना देऊन सर्व शिक्षकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
         अशा कोविडच्या परिस्थितीत शिक्षकांचा सन्मान करणे ही खरच खूप कौतुकाची व वाखाणण्याजोगी बाब आहे व असेच ज्ञानदानाच्या या अविरत कार्यासाठी राजेशजिंनि सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. तर शाळेत आल्यावर चा जिवंत पणा व शिक्षकांनी घेतलेली मेहनत खरोखरच शाळेत आल्यावर जाणवते असे सांगून शाळेत शिक्षकांचा कोविड योद्धे म्हणून असा सन्मान होताना प्रथमच बघितले व खरोखरच शिक्षकांच्या मेहनतीला हा सलाम आहे असे मत तहसीलदार
ऋषिकेष शेळके यांनी व्यक्त केले.
 
सर्व शिक्षकांची मेहनत व केलेल्या ज्ञानदानाच्या या कार्याला मान देऊन संस्थेकडून गौरविण्यात आल्याने सर्व शिक्षकांनी संस्थाचालकांप्रती आदरभाव व्यक्त केले.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल व संचालिका रेखा बांदल यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याध्यापिका नीलिमा व्यवहारे , निर्मल पंडित व  रुचीरा खानविलकर यांच्या मार्गदर्शनाने पर्यवेक्षिका रश्मी पाथरकर ,शिल्पा क्षीरसागर , शुभा कुलकर्णी तसेच सर्व शिक्षकवृद व शिक्षकेतर कर्मचारी आदी सर्वांच्या उपस्थितीत कोविड-19 योद्धा प्रशस्तिपत्रक प्रदान करण्याचा एक छोटासा प्रयत्न अत्यंत उत्साहात यशस्वीपणे संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये