पुणे शहर

गुडलक चौक परिसरातील ‘कलाकार कट्टा’चे स्थलांतर थांबवा :  नगरसेवक हर्षवर्धन मानकर यांचे आयुक्तांना निवेदन

विरोधीपक्ष नेते ॲड निलेश निकम यांच्या नेतृत्वाखाली घेतली आयुक्तांची भेट

पुणे : पुण्याच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला  ‘कलाकार कट्टा’  स्थलांतर करण्याच्या निर्णयाचा पुर्नविचार करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विरोधीपक्ष नेते ॲड निलेश निकम यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक हर्षवर्धन दीपक मानकर यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेत निवेदन दिले.

नगरसेवक हर्षवर्धन मानकर यांनी सर्वप्रथम कलाकार कट्टा स्थलांतराला विरोध दर्शवत कलाकारांच्या पाठीशी उभा राहण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांच्या वतीने उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनाही निवेदन देण्यात आले आहे.

Img 20251125 wa01788344877527023851533

नगरसेवक हर्षवर्धन मानकर म्हणाले,  गेल्या अनेक वर्षापासून फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर गुडलक चौकात असणारा “कलाकार कट्टा” हा नवोदित तसेच ज्येष्ठ कलाकारांच्या संवाद,सादरीकरण आणि विचारमंथनाचा महत्त्वाचा मंच राहिला आहे. शहरातील साहित्यिक, नाट्य,संगीत आणि विविध कला क्षेत्रातील व्यक्तींना एकत्र आणणाऱ्या या ठिकाणाचे स्थलांतर न करता जतन करावे, अशी ठाम मागणी आमची आहे.

पुण्याची सांस्कृतिक ओळख जपण्यासाठी कलाकार कट्टा चे स्थलांतरीत करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याबाबत प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आम्ही  व्यक्त केल्यानंतर आयुक्त नवल किशोर राम यांनी सकारात्मक  प्रतिसाद दिला असल्याचे मानकर यांनी सांगितले. सदरप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे गटनेते काका चव्हाण हे देखील उपस्थित होते.

Img 20250508 wa00015038950216212096978

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये