पुणे शहर

पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाला स्व.अजितदादा पवार यांचे नाव द्यावे-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात होणाऱ्या उड्डाणपुलाला माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचे नाव द्यावे, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (गुरुवारी) जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बोलताना केली.

उपमुख्यमंत्री आणि  जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. या बैठकीत बोलताना आमदार शिरोळे यांनी विद्यापीठ चौकातील पुलाचे काम लवकरात लवकर व्हावे, याकरीता पालकमंत्र्यांनी प्रशासनाला सूचना द्याव्यात, असेही सुचविले. 

Img 20251125 wa01788344877527023851533

छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघातील अनेक वाड्या-वस्त्यांवर महावितरणच्या ओव्हरहेड वायर्स आहेत, त्या धोकादायक असल्याने भूमिगत करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा,  अशीही मागणी आमदार शिरोळे यांनी केली.

तसेच पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे पुणे महापालिकेत विलीनीकरण करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यात यावी, अशी मागणी आमदार शिरोळे यांनी केली.पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी कठोर पावलं उचलावीत, असेही आमदार शिरोळे यांनी बैठकीत सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये