पुणे शहर

पुणे पालिकेचा अजब कारभार ;
वर्क ऑर्डर पूर्वीच कामाला सुरुवात..


पुणे : pune city पावसाळयापूर्वी करायच्या कामांची प्रक्रिया वेळेत करणे आवश्यक होते पण त्यात पालिका प्रशासनाने दिरंगाई केली आहे. त्यातच वर्क ऑर्डर दिल्यानंतर काम चालू करणे अपेक्षित असताना कामांची सुरूवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाचा भोंगळ कारभार पुढे आला असून सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावरील नियंत्रण पूर्णपणे सुटले असल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केला आहे .

Strange management of the pune municipality ; Work started before work order.

Img 20210516 094854

धुमाळ यांनी सांगितले की, काल बुधवारी पावसाळयापूर्वी करावयाची कामे व नालेसफाई याविषयी आढावा बैठक घेण्यात आली. पावसाळयापूर्वी करावयाची कामांसाठी १५ क्षेत्रिय कार्यालय निहाय रू.१२ कोटीच्या २२ निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्या आहेत. या कामांमध्ये सहभागी ठेकेदारांनी सादर केलेले दर पाहता किमान ४५ टक्के बिलो या दराने कामे करणेबाबत ठेकेदारांनी तयारी दर्शविली आहे.

मात्र निविदा उघडल्यानंतर प्रशासकीय मान्यता घेवून वर्क ऑर्डर दिल्यानंतर काम चालू करणे अपेक्षित असताना कामांची सुरूवात झालेली आहे. वास्तविक सत्ताधा-यांचा प्रशासनावरील नियंत्रण पूर्णपणे सुटल्याचे यावरून सिध्द झालेले आहे.

Img 20210521 wa0019 1

मागील वर्षी नाल्यांतून पाणी वाहून वसाहतींमध्ये शिरून जिवित व वित्तीय हानी झाली होती. याचा पुर्वानुभव असतानाही प्रशासनाने वेळीच निविदा राबवून नाल्यातील गाळ काढणे, नाला रूंद करणे, नाल्याची खोली वाढविणे ही कामे करणे अपेक्षित होते. आता किमान ४५ टक्के बिलो रकमेने टेंडर आल्याने कामाचा दर्जा राखला जाईल का? याची कोणतीही शाश्वती नाही. प्रशासनासोबत वेळीच यावर उपाय योजना करण्यात सत्ताधारी पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत. यावर्षी शहरात पुन्हा पूर येवून वसाहतींमध्ये पाणी शिरून जिवित व वित्तीय हानी झाल्यास यास जबाबदार कोण राहणार असा सवाल धुमाळ यांनी उपस्थित केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये