पुणे शहर

भटक्या कुत्र्यांबाबत मनेका गांधी यांच्या प्रयोगाची अंमलबजावणी करावी.- संदीप खर्डेकर

संदीप खर्डेकर यांची मागणी

पुणे : भटक्या कुत्र्यांच्या नसबंदी बाबत स्वतंत्र समिती मार्फत चौकशी करुन अहवाल प्रकाशित करावा.तसेच खासदार मनेका गांधी यांच्या यशस्वी प्रयोगाची अंमलबजावणी करावी. अशी मागणी क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी पुणे आणि पिंपरी- चिंचवड आयक्तांकडे निवेदनाव्दारे केली आहे.

निवेदनाचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होताच माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार श्रीमती मनेका गांधी यांनी खर्डेकर यांच्याशी संपर्क साधला व काही महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधले.त्यांच्या सर्वेक्षणानुसार जर भटक्या कुत्र्यांचे योग्य प्रकारे निर्बीजीकरण केले तर लवकरच त्यांची संख्या आटोक्यात येउ शकते व नागरिकांची त्रासातून सुटका होवू शकते.प्राणी संरक्षण कायद्यानुसार भटक्या कुत्र्यांना मारता येत नाही.

हे आपण जाणताच पण त्यांच्या निर्बीजीकरणाची प्रक्रिया व्यवस्थित राबवल्यास त्यांची संख्या आटोक्यात येते व त्याचबरोबर ते शांत होतात व त्यांच्यातील आक्रमकपणा कमी होतो व जाणाऱ्या -येणाऱ्या वर भुंकणे,मागे लागणे,चावा घेणे वा अन्य हिंस्र कृत्य करण्यावर आळा घालता येतो असे त्यांनी सप्रमाण सिद्ध केले आहे.

यात प्रामुख्याने दिल्लीत निर्बीजीकरण नंतर कुत्र्यांची संख्या ८ लाखावरुन १ लाखावर आली आणि विशेषत: चावण्याचे प्रमाण ही १ लाखाहून१२००० इतके खाली आले.

तरी या निवेदनाद्वारे मी अशी आग्रही मागणी करत आहे की पुण्यात व पिंपरी चिंचवड मधे गत ३ वर्षात कोणत्या संस्थांना हे काम देण्यात आले,त्यांनी किती कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले,त्याचा परिणाम काय झाला,त्यासाठी नागरिकांच्या कररुपी निधीतून किती खर्च करण्यात आला याचा तपशील जाहीर करावा.

तसेच अनधिकृतपणे उभारलेल्या चिकन मटण विक्रीच्या दुकानांवर कारवाई केली आहे का ? या दुकानांच्या भोवती व खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या हातगाड्यां भोवती मोठ्या प्रमाणावर ही कुत्री दिसून येतात.तसेच हॉटेलचा कचरा व कचराकुंडी देखील यांच्या वाढीस कारणीभूत ठरत आहेत. त्यांना विनासायास खाद्यपदार्थ उपलब्ध होत असल्याने अश्या स्थितीत प्रशासनाने याबाबतीत काय पावले उचलली याचा तपशील ही जाहीर करावा व भटक्या कुत्र्यांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी कालबद्ध कार्यक्रमाचे नियोजन करावे अशी मागणी खर्डेकर यांनी केली आहे.


Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये