पुणे शहर

अर्बन सेलच्या पुणे शहर अध्यक्षपदी स्वप्नील दुधाने

जबाबदारी पेलण्याचा व पुणे शहाराला न्याय देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न सर्वांना सोबत घेऊन करू ; स्वप्नील दुधाने

पुणे : वाढते शहरीकरण आणि शहरातील वाढत्या समस्या आज सर्वांसमोर आव्हान ठरत आहेत. पुणे शहरही त्याला अपवाद नाही. शहरातील समस्यांवर केवळ प्रश्न उभे करून चालणार नाही तर त्यावर उत्तर शोधणं आवश्यक आहे आणि त्यासाठी सर्वांनी संघटीत होणे गरजेचे आहे. यासाठी दोन वर्षापूर्वी शरद पवार यांच्या दूरदृष्टीतून अर्बन सेलची स्थापना झाली. या अर्बन सेलच्या पुणे शहराध्यक्षपदी स्वप्निल दुधाने यांची निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र अर्बन सेलच्या अध्यक्षा वंदना चव्हाण यांच्या हस्ते स्वप्नील दुधाने यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र अर्बन सेलचे समन्वयक नितिन जाधव, अर्बन सेलचे पुणे शहराचे माजी अध्यक्ष नितीन कदम, पुणे अर्बन सेलच्या सदस्य नीता गलांडे आदी उपस्थित होते.

Fb img 16474137115315333568191096823716

माझ्यावर दिलेली जबाबदारी पेलण्याचा व पुणे शहाराला न्याय देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न सर्वांना सोबत घेऊन करेल असा विश्वास अर्बन सेलच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर स्वप्नील दुधाने यांनी व्यक्त केला आहे.

दुधाने म्हणाले , आज अर्बन सेल राज्यातील विविध शहरात नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडत असून पुणे शहराचे माजी अध्यक्ष नितीन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गेल्या दोन वर्षांपासून पुणे शहरात कार्यरत आहोत. आजच्या घडीला आपल्या पुणे शहरातील रस्ते, पाणी, शिक्षण, पर्यावरण तसेच अन्य अनेक मूलभूत समस्यांना तोंड देत असताना नागरिक आणि प्रशासन यांच्यातील दुवा बनत या समस्यांना निवारीत करण्यासाठी समन्वयक म्हणून मी कार्यरत होतो.

Img 20240404 wa00123413096165072096535

आज अध्यक्षपदाची ही जबाबदारी स्वीकारताना  वंदनाताईंनी व सर्व अर्बन सेलच्या पदाधिकारी यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल मनःपूर्वक आभार मानतो. आजवर नागरिकांना विश्वासात घेऊन केलेल्या विकासकामांची ही पोहोचपावती आहे. 

Screenshot 2024 08 20 16 33 27 551301213897430355510
Img 20240404 wa00134916733315783821383
Img 20240825 wa00083165119374082998524

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये