पुणे शहर

पौड रस्त्यावर गॅस लाईन फुटली ; भीतीचे वातावरण पाहा व्हिडिओ…

पुणे : पौड रस्त्यावरील मोरे विद्यालय चौकामध्ये एमएनजीएल कंपनीची गॅस लाईन फुटल्याने लाईन मधून प्रचंड मोठया प्रमाणावर गॅस ची गळती सुरू झाली आहे. या गॅसच्या आवाजामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.अग्नीशमन दल, पोलिस अधिकारी आणि एमएनजीएल कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत.(The gas line burst on Paud Road; An atmosphere of fear among the citizens)

पाहा व्हिडिओ

दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. स्थानिक नगरसेवक दीपक मानकर यांच्या कार्यकर्त्यांनी तातडीने अग्निशमन दल, पोलिस आणि एमएनजीएल कंपनीला कळविल्यानंतर या ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे.राजकिय फ्लेक्स लावण्यासाठी खोदाई करताना ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

दिवा प्रतिष्ठानचे हर्षवर्धन मानकर म्हणाले, हा प्रकार अतिशय गंभीर असून तातडीने दुरुस्तीचे काम सुरू केल्याने सुदैवाने गंभीर अपघात झाला नाही. मात्र गॅसच्या आवाजामुळे आणि वासा मुळे नागरिक भयभीत झाले आहेत. तरी संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी.

Img 20210727 wa0218

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये