पुणे शहर

कोथरूडकरांना कचरा व्यवस्थापनाबाबत पालिका अधिकाऱ्यांचे महत्वपूर्ण आवाहन..

पुणे : कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय पुणे महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने”स्वच्छ भारत अभियान व स्वच्छ सर्वेक्षण मिशन अंतर्गत यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे ओला व सुका कचरा वर्गीकरण, ओला कचरा आपल्या सोसायटीच्या आवारात कशाप्रकारे जिरवावा याविषयी विविध कंपन्यांच्या माध्यमातून प्रात्यक्षिक व मार्गदर्शन करण्यात आले.

सदरच्या मार्गदर्शन पर व्याख्यानमालेत मार्गदर्शन करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त आशा राऊत उपस्थित होत्या. कोथरूड भागातील नागरिकांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या कोथरूड उपनगरातील प्रभाग क्रमांक १०,११,१२ मधील ७० पेक्षा अधिक सदनिका असणाऱ्या सोसायट्यांनी आपला ओला कचरा आपल्या सोसायटीच्या आवारातच जिरवावा व त्यापासून उत्तम प्रकारे खत तयार करून ते आपल्या आवारातील बागेतील झाडाझुडपांना वापरावे.

निसर्गाची देणगी निसर्गाला द्या आपल्या आरोग्याचे रक्षण करा, आपला कचरा आपल्या आवरातच जिरवला व रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलर सिस्टिम राबल्यानंतर महानगरपालिकेच्या वतीने प्रत्येक सदनिका धारकांना १०% कर सवलत मिळवा. यासाठी दरवर्षी महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे लेखी स्वरुपात अर्ज करावा. स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये पुणे शहराला एक नंबर आणण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच ज्या सोसायट्या आपला ओला कचरा जिरवणार आपल्या आवारातच जिरवत नाहीत अशा सोसायट्यांना महापालिकेच्या वतीने कडक दंडात्मक कारवाई करण्यात येईल असेही सुचित केले.

Fb img 1647413711531 1

कोथरूड उपनगरातील नागरिक हा सुज्ञ व जागरूक असल्याने ते सकारात्मक भूमिका घेतील व पुणे शहर यावर्षी स्वच्छ स्पर्धेमध्ये एक नंबर आणण्यामध्ये योग्य ती भूमिका बजावतील अशी अपेक्षा व्यक्त केली.

सहायक आरोग्य प्रमुख डॉ. केतकी घाटगे यांनी व्याख्यांमध्ये उपस्थित असणाऱ्या नागरिकांची अभिनंदन करून स्वच्छ सर्वेक्षण मध्ये नागरिकांनी सहभागी व्हा आणि आपल्या आरोग्याचे रक्षण करा, तसेच नदी नाले नैसर्गिक प्रवाहाचे जतन करा असे आवाहन केले. वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे म्हणाले, प्रत्येक आरोग्य मंदिराच्या वतीने त्या त्या भागामध्ये सोसायटीच्या नागरिकांना एकत्र करून ओला कचरा कसा जिरवावा व वैयक्तिक कंपोस्ट खत कसे तयार करावे याविषयी योग्य ते मार्गदर्शन करण्यात येईल. शिवाय कोथरूड भागातील शाळा महाविद्यालयामध्ये स्वच्छतेच्या संदर्भात कार्यशाळा व व्याख्यानमाला घेणार आहोत यामध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

सदर व्याख्यानमालेत एनोराचे अनुपमा गुमठेकर, अभिजीत देशमुख, प्रोअर्थ इकोसिस्टीम प्राथमिक लिमिटेडच्या हमसा अय्यर, योगेश काकुळते, रामशा ॲग्रोटेकचे महेश लाड, प्राईम सोल्युशनचे दत्तात्रय मारणे, नचिकेत इंजिनिअरिंगच्या अर्चना कुमणे, स्वेद केमिकल्सचे गणेश जाधव यांनी आपापल्या खत प्रकल्पाच्या उपकरणाची माहिती देऊन ओला कचरा जिरवण्यासंदर्भात योग्य ते मार्गदर्शन केले.

वेलवर्थ टेन्शन टाऊनचे चेअरमन विवेक शेष, पार्कच्या शुभदा घाडगे, शीला विहार कॉलनीच्या ज्येष्ठ चेअरमन स्मिता परदेशी तसेच उपस्थित नागरिकांनी स्वच्छतेच्या संदर्भातल्या शंका कुशंका व्यक्त केल्या व त्यांच्या शंका कुशंकाना योग्य उत्तरे आशा राऊत यांनी उत्तरे दिली.

लक्ष्मी नगर मधील कार्यकर्ते बाळू दांडेकर यांनी झोपडपट्टी मधील नागरिक ओला व सुका कचरा वर्गीकृत करून एका ओळीने महानगरपालिकेच्या सिस्टीमला आणून देतात शिवाय डिजिटल लक्ष्मी नगर करण्यासाठी लक्ष्मी नगर मधील निर्माण होणारा ओला कचरा हा त्याच ठिकाणी आम्ही जिरवण्याचा प्रकल्प करणार आहोत त्याचे काम चालू आहे. सदर ठिकाणी काम करत असलेल्या सफाई सैनिकांचे व अधिकाऱ्यांचे कौतुकही केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असताना कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाचे ब्रँड ॲम्बेसिडर वैजीनाथ गायकवाड यांनी “स्वच्छतेची चळवळ मनपा कर्मचाऱ्यांची व अधिकाऱ्यांची नसून ती चळवळ जनताभिमुख व्हावी व प्रत्येक नागरिकांनी स्वच्छतेच्या संदर्भातील वेगवेगळ्या मोहिमांमध्ये सहभागी होऊन संत गाडगेबाबा महाराजांच्या स्वप्नातील स्वच्छ भारत, स्वच्छ गांव, स्वच्छ परिसर घडवू या आणि आपले शहर स्वच्छ ठेवूया आपल्या आरोग्याचे रक्षण करूया असे आवाहन केले.

सदर कचरा वर्गीकरण व्याख्यानमालेत कोथरूड भागातील बी. डब्ल्यू .जी. १५० सोसायटीतील नागरिकांनी सहभाग घेतला. यावेळी उपायुक्त आशा राऊत, नितीन उदास यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका सहाय्यक आयुक्त केदार वझे यांच्या उपस्थितीत वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली व आरोग्य निरीक्षक सचिन लोहकरे, करण कुंभार, रूपाली शेडगे, वैभव घटकांबळे, शिवाजी गायकवाड, संतोष ताटकर, प्रमोद चव्हाण, नवनाथ मोकाशी, गणेश साठे, हनुमंत चाकणकर, गणेश चोंधे, सतीश बनसोडे यांच्या निरिक्षणाखाली व मोकादम वैजीनाथ गायकवाड, आण्णा ढावरे, अशोक खुडे, अशोक कांबळे, साईनाथ तेलंगी, राम गायकवाड, विजय पाटील, सुभाष पड्ये, गणेश चव्हाण, राजकुमार कांबळे, लक्ष्मण सोनवणे, कुणाल कांबळे, निशांत सकट, विलास थोरात यांनी परिश्रम घेतले. कचरा वर्गीकरण व्याख्यानमालेचा समारोप प्रसंगी महापालिका सहाय्यक आयुक्त केदार वझे यांनी नागरिकांचे अभिनंदन केले.

Img 20221126 wa02126927299965323449855

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये