पुणे शहर

आज शिवसेनेचा वर्धापन दिन पण शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोथरूडमध्ये शांतताच…

पुणे : शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेच्या दोन गटांकडून वर्धापन दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरात शिवसेनेची चर्चा सुरू असतानाच शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या कोथरूड मतदारसंघात मात्र अपवाद वगळता कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पहायला मिळाला नाही.

पुणे शहरात शिवसेना ठाकरे गटाची मोठी ताकद असलेल्या कोथरूड मतदारसंघात शिवसेनेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा होईल. अशी अपेक्षा असताना अपवाद वगळता पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम तर आयोजित केलेच नाही. पण साधे जाहिरात फलकही लावलेले दिसले नाही. त्यामुळे कोथरूड मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी ॲक्टिव मोडवर कधी येणार असा प्रश्न शिवसैनिकांना पडला आहे.

Img 20220425 wa001080841499313169957854513307260893077682

पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेचा आमदार व्हावा म्हणून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी युतीमध्ये भाजप कडून पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघ मागून घेतला. त्यावेळी शशिकांत सुतार शिवसेनेचे आमदार झाले. यानंतर विनायक निम्हण शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार झाले. 2009 साली मतदारसंघ पुनर्रचनेत शिवाजीनगर आणि कोथरूड असे दोन मतदारसंघ निर्माण झाले. यावेळी शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे आमदार झाले. मात्र 2014 साली भाजप शिवसेना युती तुटली आणि भाजपाच्या मेधा कुलकर्णी या आमदार झाल्या. तर गेल्या निवडणूकीत मंत्री चंद्रकांत पाटील कोथरूड मधून आमदार झाले.

गेल्या वर्षी शिवसेनेत अभुतपूर्व असे बंड घडवून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. यावेळी 40 आमदार आणि राज्यातील अनेक पदाधिकारी शिंदे यांच्या सोबत गेले. यावेळी कोथरूड मधील शिवसेनेचे पदाधिकारी उध्दव ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिले. मात्र काही जणांचा अपवाद वगळता या भागात संघटना शांतच असल्याचे पाहायला मिळते.

खरे पाहता कोथरूड मतदारसंघात शिवसेनेची चांगली ताकद आहे. परंतू संघटना शांतच असल्याने कार्यकर्ते नेहमी संभ्रमात आहेत. पक्षाच्या नेत्यांकडून जाहिरात बाजी करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र मोजक्याच कार्यकर्त्यांकडून फ्लेक्स, होर्डिंग्ज लावण्यात आले. तर पदाधिकाऱ्यांनी शांतच राहणे पसंत केले.

महापालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणुक जवळ आलेली असताना शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी आता तरी मरगळ झटकून कामाला सुरुवात केली पाहिजे. अशी अपेक्षा सर्व सामान्य शिवसैनिक व्यक्त करीत आहेत.

Fb img 16837376233493064729888638918603

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये