महाराष्ट्र

ब्राह्मणांना आरक्षण नाही हे परमेश्वराचे खूप मोठे उपकार : नितीन गडकरी

मुंबई : आरक्षण नसल्यामुळे ब्राह्मण समाज व्यवसायाकडे वळला. त्यामुळे ब्राह्मणांना कुठलंही आरक्षण नाही हे परमेश्वराचे खूप मोठे उपकार आहेत, असं मी मानतो, असं मत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे.

पार्ल्याच्या लोकमान्य सेवा संघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात गडकरी यांची विशेष मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले. मराठी माणसं व्यवसायाकडे वळत आहेत, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणींचा उल्लेख करत ते म्हणाले, “तुमच्या मनातील इच्छाशक्ती मजबूत असेल तर तुम्ही या अडचणींवर मात करू शकता. सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांना आरक्षण असावे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये