पुणे शहर

मातोश्री डळमळीत करायची आहे का? चंद्रकांत पाटील यांचा संजय राऊतांवर निशाणा

मुंबई : संजय राऊतांना मातोश्री डळमळीत करायची आहे का? संजय राऊत कुणाच्यातरी इशाऱ्यावर चालतात. तो कुणाचा इशारा आहे, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्या इशाऱ्यावर ते मातोश्रीचा पाया उखडण्याच्या प्रयत्नात आहेत का? तो उखडून इशारा करणाऱ्यांना मुख्यमंत्री करायचंय का? असा प्रश्न भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर कोर्लाईमधील १९ बंगल्यांच्या प्रकरणावरून आरोप केल्यानंतर त्यावर चंद्रकांत पाटील यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी “मातोश्रीचा पाया उखडण्याचा प्रयत्न” सुरू असल्याचे म्हटले आहे.  “महाराष्ट्रात आता असं व्यक्तिमत्व शोधावं लागेल की जे अराजकीय असेल आणि त्यांचं म्हणणं सगळ्या राजकीय पक्षांना मान्य होईल. शेवटी लोक निवडून देतात, अशा मुख्यमंत्र्यांची ही जबाबदारी असते की त्यांनी राज्यात कुठल्या एका पक्षाचं किंवा गटाचं प्रतिनिधित्न न करता सौहार्दानं महाराष्ट्र चालवायचा असतो. त्यांनी सगळ्यांना चर्चेसाठी बोलावलं पाहिजे. पण ते कसे बोलवणार? कारण त्यांच्या सामनामध्ये रश्मी ठाकरे संपादक असून सुद्धा ज्या प्रकारची भाषा वापरली जाते, ते पाहाता त्यांनी रश्मी ठाकरेंऐवजी अनिल परब यांना संपादक करायला हवं”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

Img 20220217 wa0003

“खूपच इंटरेस्टिंग गोष्टी घडतायत. त्यांचा अर्थ लावण्यासाठी कुणीतरी अंतर्ज्ञानीच लागेल. संजय राऊतांनी 19 बंगल्यांचं प्रकरण काढायची काहीच गरज नव्हती. त्यांच्यावर जे आरोप झाले, त्यावर त्यांनी बोलायचं होतं. त्याऐवजी खूप दिवसांपूर्वी आलेल्या 19 बंगल्यांचा विषय त्यांनी काढला. प्रकरण रश्मी ठाकरेंपर्यंत नेलं”, असं पाटील यांनी सांगितले.

महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा फार हुशार राजकारणी आहेत. उद्धव ठाकरे, नाना पटोले यांना कळतच नाहीये की कसं कठपुतलीच्या खेळाप्रमाणे आपल्याला उचकवलं जातंय. अजेंडा दिला जातोय. हा वर्षानुवर्ष खेळ चाललाय, असं पाटील म्हणाले. यावेळी पत्रकारांनी आपण शरद पवारांविषयी बोलताय का? अशी विचारणा केली असता त्याला पूर्णपणे नकारही न देता पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले,मी कुणाचंही नाव घेतलेलं नाही. महाविकास आघाडी ज्यांनी तयार केली, जे चालवतात त्यांच्याकडून आपण कसे फसले जाणार आहोत, हे वर्षानुवर्ष जे फसवले गेले आहेत, त्यांच्या अनुभवातून शिकायला हवं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये