अमोल बालवडकर फाऊंडेशनतर्फे सलग 20 व्या दिवशी “मिशन निर्मल” स्वच्छता अभियान उत्साहात सुरू….

पुणे : अमोल बालवडकर फाऊंडेशनतर्फे तसेच पुणे महानगरपालिका व आदर पूनावाला यांच्या सहकार्याने आणि स्वच्छ पॅनकार्ड रोड अभियानाच्या समन्वयाने प्रभाग क्र.०९ बाणेर-बालेवाडी -सुस-म्हाळुंगे-पाषाण- सुतारवाडी -सोमेश्वरवाडी भागात “मिशन निर्मल” स्वच्छता अभियानचा शुभारंभ करण्यात आला.मिशन निर्मल स्वच्छता अभियानाचा सलग 20 वा दिवस आहे.
अमोल बालवडकर फाऊंडेशनतर्फे सुरू करण्यात आलेल्या मिशन निर्मल” स्वच्छता अभियानात 20 व्या दिवशी बाणेर योगी पार्क परिसरात मिशन निर्मल अंतर्गत स्वच्छता सुरु आहे. तसेच बाणेर मधील लेन क्र. १ – ख्रिसमस डेल, आवन, सप्तगिरी, अथाश्री, टिवोना, ड्रीम,लेन क्र. २ – स्नेह, आर्टिक सोसायटी, पद्मश्री, गोकुळ, सुखवाणी युफोरिया, कपिल अखिला सोसायटी,लेन क्र. ३ – साई प्रसाद अपार्टमेंट, चिंतामणी, केर्न्स्ट पार्क, पूजा-पवन अपार्टमेंट, हेरिटेज, रिवांश आयकॉन, एस.एम.के. ॲकॅडमी, सखा निवास,लेन क्र. ४ – ट्युलिप, ३३ वेस्ट अव्हेन्यू, गगन प्रॉपर्टीज, सुशील्प बंगला, ग्रीन लीफ अपार्टमेंट, गेरा’ज, सिद्धिनाथ, साहिल सेरीन, ऑलिव्ह क्रेस्ट तसेच कृष्णा मेडिकलसमोर, पॅन कार्ड क्लब रोड, बाणेर येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

अमोल बालवडकर म्हणाले, परिसरातील नागरिक, स्वयंसेवक आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागामुळे आजच्या दिवसाचं साफसफाईचे काम अधिक परिणामकारक ठरलं.आजच्या मोहिमेत वरील विविध सोसायटी परिसराची स्वच्छता करण्यात आली. तसेच कचरा संकलन व स्वच्छतेबाबत जनजागृतीही करण्यात आली. नागरिकांनी ‘आपला परिसर, स्वच्छ परिसर’ या भावनेतून मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.दररोज नवा उत्साह आणि नव्या ऊर्जेसह “मिशन निर्मल” अभियान अधिक प्रभावीपणे पुढे जात आहे. हि मोहीम अशीच सुरू राहणार आहे.












