मनसेची विधानसभा उमेदवारांची यादी जाहीर ; कोथरूड मधून किशोर शिंदे यांना संधी…

विधानसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपली उमेदवार यादी जाहीर केली असून पुण्यातील कोथरूड मतदार संघातून किशोर शिंदे, हडपसर मधून साईनाथ बाबर तर खडकवासला मतदार संघातून मयुरेश रमेश वांजळे यांना संधी देण्यात आली आहे.
किशोर शिंदे यांनी तीन वेळा कोथरूड मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढवली असून दोन वेळा चुरशीच्या लढतीत त्यांची संधी हुकली आहे. भाजपने या मतदार संघातून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली असून ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार जाहीर होणे बाकी आहे. चंद्रकांत मोकाटे व पृथ्वीराज सुतार शिवसेनेकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.
मयुरेश वांजळे हे दिवंगत आमदार गोल्डन मॅन रमेश वांजळे यांचे पुत्र आहेत. मागील काही महिने ते खडकवासला मतदार संघात चांगली तयारी करत असून राज ठाकरे यांनी तरुण चेहऱ्याला संधी दिली आहे.
मनसेची उमेदवारांची जाहीर झालेली यादी



















