पुणे शहर

वारजेत मुठा नदीतील पाण्याचे जलपूजन ; सचिन बराटे व दत्ता झंजे यांचा नदीपात्र प्रदूषणविरहित व स्वच्छ ठेवण्याचा संकल्प..

वारजे : pune city, warje – खडकवासला धरण भरल्यानंतर मुठा नदीत सोडण्यात आलेल्या पाण्याचे साडी चोळी व नारळ वाहुन वारजे येथे वारजे माळवाडी ग्रामस्थ व रहिवाशांकडून जलपूजन करण्यात आले. यावेळी पाण्याच्या प्रति कृतज्ञता करत सचिन बराटे व दत्ता झंजे यांच्याकडून नदीपात्र प्रदूषणविरहित व स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करण्यात आला. Mutha river water worship in Warje;  Sachin Barate and Datta Zanje’s determination to keep the river basin pollution free and clean ..

यावेळी ह.भ.प रामचंद्र महाराज भरेकर, सचिन रामभाऊ बराटे, ह.भ.प कैलास विठोबा देवकर, दत्ता झंजे, मारुती मोहिते, मुक्ताबाई कैलास देवकर, केदार बराटे, प्रमोद देवकर, निखिल बराटे, शिवाजी खिल्लारी, प्रथमेश पवार आदी उपस्थित होते.

सचिन बराटे म्हणाले, आम्ही लहान असताना पाहिलेली नदी व आताची नदी यात फार फरक झाला आहे. आता नदी पात्र स्वच्छ व प्रदूषणविरहित ठेवण्याची गरज असून त्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच शहरी भागाचे सांडपाणी थेट मुठा नदीपात्रात सोडले जाऊ नये यासाठी नदीच्या कडेने ड्रेनेज लाईन टाकण्यात याव्यात व मैलापाणी शुद्धीकरण केंद्र उभारण्यात यावीत यासाठी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करणार आहे.

Img 20210725 wa0160
Img 20210724 wa0001

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये