मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त ९ नोव्हेंबरला रक्तदानाचा महायज्ञ

पुणे : भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान महासंकल्प दिवस साजरा केला जात असून बुधवार दिनांक 9 नोव्हेंबर रोजी भव्य रक्तदानाचा महायज्ञ आयोजित करण्यात आला आहे. मोठ्या संख्येने या रक्तदान महायज्ञात सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे.
कर्वेनगर मधील राजाराम पूल – म्हात्रे पूल डीपी रस्त्यावरील पंडित फार्म या ठिकाणी 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते रात्री ८ या वेळेत हा रक्तदान महायज्ञ घेण्यात येणार आहे. मोहोळ यांचा वाढदिवस नेहेमीच समजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात येत असतो. रक्तदान हा त्यातला एक महत्वाचा उपक्रम. या उपक्रमात मोठ्या संख्येने पुणे शहरातील नागरिक सहभागी होऊन रक्तदान करत असतात, त्यात तरुणांची संख्या मोठी असते.

रक्तदान म्हणजे जीवदान व रक्ताविना कोणता रुग्ण दगावला जाऊ नये हा शिबिर आयोजन करण्यामागचा हेतू आहे. मागील वर्षी करोना काळात पुणे शहरात रक्ताचा तूटवडा जाणवत असताना या दिवशी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामुळे रक्त उपलब्ध होण्यास हातभार लागला होता. शहरात अनेक जणांनी त्यावेळी रक्तदान घेऊन आपले सामाजिक कर्तव्य पार पाडले होते.
9 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते रात्री ८ या वेळेत घेण्यात आलेल्या रक्तदान महायज्ञा त मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.















