कोथरुड

कोथरुडमधील लक्ष्मीनगर येथील नागरिकांचा आदर्श शहरातील इतर झोपडपट्टीतील रहिवाशांनी घ्यावा : युवराज देशमुख

कोथरुड : कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय आरोग्य विभाग, जनवाणी सहकारी संस्था, स्वच्छ सहकारी संस्था, कमिन्स इंडिया लिमिटेड कंपनी, क्रिश डान्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्रमांक १२, डहाणूकर कॉलनी व कोथरूड गावठाण अंतर्गत लक्ष्मीनगर व श्रावण धारा वसाहत झोपडपट्टीतील नागरिकांमध्ये कचरा वर्गीकरण करण्याच्या संदर्भात कार्यशाळा घेऊन प्रबोधन करण्यात आले.

सदर कार्यक्रम “स्वच्छ भारत अभियान व स्वच्छ सर्वेक्षण मिशन २०२२” अन्वये घेण्यात आला. या सर्व स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून कोथरूड उपनगरातील शाळा व महाविद्यालय तसेच झोपडपट्टीच्या भागात कचरा वर्गीकरण, सार्वजनिक स्वच्छता शौचालयाची स्वच्छता व निगा राखणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, नदी नाल्यात कचरा टाकणे इत्यादी संदर्भात अनेक प्रकारचे प्रबोधनात्मक कार्यक्रम गेली सतरा वर्षापासून राबवण्यात येत आहेत. या सततच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमामुळे विशेषतः लक्ष्मीनगर व श्रावणधारा या झोपडपट्टीतील नागरिकांकडून ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करण्यात येत आहे. सदर कार्यक्रम महिन्यातून दोन वेळा आयोजित करून स्वच्छतेच्या संदर्भातले प्रबोधनात्मक फिल्म दाखवून स्वच्छता कशी ठेवायची व कचऱ्याचे वर्गीकरण कसे करायचे याविषयी वारंवार प्रबोधन केल्यामुळे नागरिकांमध्ये जनजागृती झाल्याचे दिसून येत आहे. 

सदर लक्ष्मीनगर झोपडपट्टीतील नागरिक कचरा वर्गीकरणाविषयी जागृक आहेत का ? याविषयीची पहाणी करण्यासाठी घनकचरा विभागातील नगर उप अभियंता  युवराज देशमुख यांनी अचानकपणे येऊन तपासणी केली असता,” . महिला व पुरुष शिस्तबद्ध एका रांगेत उभे  राहून वर्गीकृत केलेला कचरा स्वच्छच्या स्वयंसेवकाकडे देत असल्याचे निदर्शनास आले तसेच झोपडपट्टीतील स्वच्छता, नागरिकांची शिस्तबद्ध रांग पाहून शिवाय योग्य पद्धतीने वर्गीकरण केलेला कचरा पाहून त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.  ” खरोखरच झोपडपट्टीतील नागरिक स्वच्छतेच्या व वर्गीकरणाच्या बाबतीत जागरूक व सुज्ञ आहेत. पुणे शहरातील सर्व झोपडपट्टीतील नागरिकांनी त्यांचा आदर्श  घ्यावा असे आवाहन देशमुख यांनी यावेळी केले.

सदर कार्यक्रम महापालिका सहाय्यक आयुक्त मा. सचिन तामखडे यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली तसेच आरोग्य निरीक्षक सचिन लोहकरे,  करण कुंभार मोकादम वैजीनाथ गायकवाड, आण्णा ढावरे, कुणाल जाधव, दत्ता जाधव,  कुचेकर यांनी परिश्रम घेतले.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये