पुणे शहर

सहयाद्री कुणबी संघ पुणे शहर आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे: सहयाद्री कुणबी संघ पुणे शहराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात एकूण १३२ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली..

या रक्तदान शिबिरामध्ये संघटनेचे सर्व महाराष्ट्र प्रांत पदाधिकारी, पुणे शहर पदाधिकारी, सर्व विभाग आणि पुणे शहर महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाच्या वेळी कोथरूड विभागाचे सर्व नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, इतर संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Img 20231111 wa0004281292791598778819580777

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. रक्तदानाची सुरवात सह्याद्री कुणबी संघ पुणे शहराचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी रक्तदान करून केली. शिबिर यशस्वी करण्यासाठी संघटनेच्या सर्वच पदाधिकारी यांनी मेहनत घेतली. कोथरूड विभागाच्या कार्यकर्त्यांनी ही कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी मोलाचे योगदान दिले.

Img 20230717 wa0012281294586790481769091554
Img 20230511 wa0002282292722773256594657904

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये