महाराष्ट्र

सदावर्तेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी हल्लाबोल केला. आता या प्रकरणी मुंबई पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. मुंबई पोलिसांचे चार ते पाच वरिष्ठ पोलिस अधिकारी गुणरत्न सदावर्ते यांच्या परळ येथील घरी पोहोचले. सदावर्ते यांना मुंबई पोलिसांनी अटक केलीआहे. गुणरत्न सदावर्तेंवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना किला कोर्टात हजर करण्यात आले आहे.

माझ्या जीवाला धोका आहे. माझा खून होऊ शकतो. माझी हत्या होऊ शकते, असा गंभीर आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना सदावर्ते यांनी चिथावल्याचं बोललं जात आहे. सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांना चिथावलं आणि भडकवलं, याचे पुरावे मुंबई पोलिसांकडे असल्याचं सांगण्यात येत आहे.

शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्याप्रकरणी 105 एसटी कर्मचाऱ्यांवर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी सर्व 105 आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी या सर्वांना शरद पवार यांच्या घराच्या परिसरातून ताब्यात घेतलं. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मुंबई पोलिसांना कारवाईचे आदेश दिले आहे. मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे आणि सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असं गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितलं. एसटी कर्मचाऱ्यांची कुणीतरी दिशाभूल केली आहे. हल्लामागे कोणीतरी सूत्रधार आहे, असा संशय वळसे-पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Fb img 1648963058213

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये