कोथरुडपुणे शहर

भाजप महिला मोर्चा कोथरूड मतदारसंघातर्फे नवदुर्गांचा सन्मान

पुणे : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा कोथरुड मतदारसंघातर्फे नवरात्रीनिमित्त नवदुर्गांचे प्रतिक असलेल्या आणी खरे समाजरत्न म्हणता येतील अशा विविध क्षेत्रातील कर्तबगार व प्रथीतयश महिलांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी शैला डावरे (पुण्यातील प्रथम महिला रिक्षाचालक), डॉ. लिना दबडगावकर (मोफत ग्रामीण वैद्यकीय सेवा), निधी भाटीया (फॅशन डिझायनर),सिमा दाबके (दिव्यांगांसाठी समाजकार्य), डॉ. हेमांगीनी पाटसकर (मोफत कोव्हिड सेवा), मेधा ताडपत्रीकर (घनकचरा व्यवस्थापन), माधुरी दंडगे (राष्ट्रीय शास्त्रीय गायिका), रुपा हुडेकर (ज्योतिषशास्री),  विणा मोकाशी (समाजसेवा), कल्याणी कलवंत (समाजसेवा),मंजुषा पाटील (गायन) या कर्तबगार महिलांचा  सन्मान करण्यात आला.

भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा उमा खापरे, महिला मोर्चा पुणे शहर अध्यक्षा अर्चना पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व हस्ते सर्वांना गौरवण्यात आले.

याप्रसंगी महिला मोर्चा प्रदेश चिटणीस वर्षा डहाळे, भाजपा पुणे शहर चिटणीस अनिता तलाठी, महिला मोर्चा पुणे शहर सरचिटणीस कांचन कुंबरे,कार्यक्रमाच्या संयोजिका व  भाजपा महिला मोर्चा-कोथरुड मतदारसंघाच्या अध्यक्षा हर्षदा अभिजीत फरांदे,नगरसेविका अल्पना वर्पे, छाया मारणे, वासंती जाधव, माधुरी सहस्त्रबुद्धे, मंजुश्री खर्डेकर, मिताली सावळेकर, जयंत भावे, बाळासाहेब टेमकर, भाजप कोथरुड सरचिटणीस अभिजीत गाडे, उपाध्यक्ष रुपेश भोसले, ओबीसी मोर्चा अध्यक्ष रमेश चव्हाण, कोथरुड महिला मोर्चा सरचिटणीस गायत्री काळभोर, केतकी कुलकर्णी, सुरेखा जगताप, शितल गुंड, उपाध्यक्षा जयश्री तलेसरा, पल्लवी गाडगीळ, सुप्रिया माझीरे, किर्ती  गावडे, मनिषा पवार, चिटणीस विद्या टेमकर, सुवर्णा काकडे, अमरजा पटवर्धन, रमा डांगे, सुषमा तेलकर, जयश्री टेमघरे, भाजपा प्रभाग १३ अध्यक्ष राजेंद्र येडे, अमोल डांगे तथा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नियोजनासाठी अत्यंत कमी कालावधी उपलब्ध असूनदेखील हा कार्यक्रम मोठ्या प्रतिसादासह उत्साहात व आनंदात पार पडला.

8 3
7 11
Screenshot 2020 10 12 12 19 40 67
Screenshot 2020 10 11 11 07 57 41 2

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये