मंत्री आदित्य ठाकरे यांच्याबाबतची बदनामीकारक पोस्ट पुणे स्मार्ट सिटीच्या ट्विटरवर रीट्विट करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई ; पृथ्वीराज सुतार यांनी दिला होता आंदोलनाचा इशारा..

पुणे : पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. च्या ट्विटर हँडलवर पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याबाबत बदनामीकारक पोस्ट रीट्विट करणाऱ्या कर्मचाऱ्यावर शिवसेना गटनेते व पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. चे संचालक पृथ्वीराज सुतार यांच्या तक्रारीनंतर कारवाई करण्यात आली आहे. Action taken against Pune Smart City employee who retweeted defamatory post about Minister Aditya Thackeray on Twitter
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याबाबत आमदार निलेश राणे यांनी ट्विटरून बदनामीकारक वक्तव्य केले होते. हे ट्विट पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. च्या ट्विटर हँडलवर संबधित कर्मचाऱ्याने रीट्विट केले होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.

याबाबत पृथ्वीराज सुतार यांनी आक्रमक भूमिका घेत हा प्रकार गंभीर असून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या बाबतचे बदनाम बदनामीकारक वक्तव्य पुणे स्मार्ट सिटी सारख्या निमशासकीय दर्जाच्या संस्थेच्या अधिकृत पुणे स्मार्ट सिटीच्या अधिकृत ट्विटर हँडलवर रीट्विट होणे हे खेदजनक असून या संबधित व्यक्तीवर कडक कारवाई करून भविष्यात असा प्रकार घडणार नाही याची खबरदारी घ्यावी अन्यथा शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुतार यांनी दिला होता.
सुतार यांच्या तक्रारीनंतर पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ संजय कोलते यांचेकडून कुटुंब एच आर, नॉयडा यांच्या रोलवर कार्यरत असलेल्या (ऑफ रोल) सोशल मिडीया आयटी स्पेशलिस्ट, यांचेकडून सोशल मिडीयावर कपंनीशी संबधित नसलेले राजकीय स्वरुपाचे ट्विट शेअर करणाऱ्या सदर कर्मचाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्यात आली असून त्यांना पुणे स्मार्ट सिटीच्या कार्यालयातून कार्यमुक्त करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे कुटुंब एच आर, नॉयडा यांना भविष्यात कोणत्याही कर्मचाऱ्याकडून अशा प्रकारची चूक परत झाल्यास त्यांचेबरोबर करण्यात
आलेला करार रद्द करण्यात येईल असे सूचित करण्यात आले आहे.
तसेच कार्यालयाच्या दि.२१/०५/२०२१ रोजीच्या कार्यालयीन आदेशानूसार सोशल मिडीयाचे फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर आणि स्मार्ट सिटी वेबसाईटचे कामकाज(Custody) कार्यालयातील मुख्य ज्ञान अधिकारी अनिरुध्द शहापुरे यांचेकडे सोपविण्यात आलेले आहे. या कार्यालयाच्या अधिकारी/कर्मचाऱ्यांकडून अशा प्रकारच्या चूका भविष्यात होणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.



