पुणे शहर

पुणे शहरात सलग पाचव्या दिवशी कमी रूग्ण संख्या ;सोमवारी दोन महिन्यांतील रूग्ण संख्येचा नीचांक

पुणे : पुणे शहरात आता रोज कोरोना रुग्णसंख्येचे नव नवे नीचांक पाहायला मिळत आहेत. पुण्यात परिस्थिती एवढी गंभीर झाली होती की, कोरोना रुग्णांच्या रोजच्या संख्येनं प्रशासनाचे डोळे पांढरे होत होते. पण सोमवारी या सर्वातून पुण्याचा प्रचंड मोठा दिलासा मिळाला आहे. सोमवारी पुण्यातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या ही 500 च्या आत असल्याचं पाहायला मिळालं.(Low number of patients for the fifth day in a row in Pune city; The lowest number of patients in two months on Monday)

Img 20210522 wa0203

पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या ही संपूर्ण राज्यासाठी देखिल चिंतेची बाब होती. संपूर्ण देशात कोरोनाचा अत्यंत झपाट्यानं विकास होणाऱ्या जिल्ह्यांच्या नकोशा यादीत देखिल पुण्याला स्थान मिळालं होतं. पण एवढी गंभीर परिस्थिती झाल्यानंतरही पुणे महानगरपालिका प्रशासनाने अत्यंत योग्यरित्या नियोजन करून कोरोनाला आळा घालण्यात यश मिळवल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचाच परिमाण म्हणजे सोमवारी पुण्यात नव्याने कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा हा अवघा 494 होता. त्यामुळं 500 च्या आत रुग्णसंख्या असल्यानं सर्वांनाच दिलासा मिळाला आहे.

पुणे कोरोना – गेल्या पाच दिवसातील आकडेवारी

Img 20210524 wa0011

नवे रुग्ण
२४ मे : ४९४
२३ मे : ७०९
२२ मे : ८४०
२१ मे : ९७३
२० मे : ९३१

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये