वारजेतील गोकुळनगर पठार ते सहयोगनगर रस्त्याचे काम भारतभूषण आबा बराटे यांच्याकडून स्वखर्चाने सुरू ; नागरिकांमध्ये आनंदोत्सव..

वारजे : गेली अनेक वर्ष रखडलेला गोकुळनगर पठार-सहयोगनगर या १.५ किलोमीटर अंतर असलेल्या रस्त्याचे काम सामाजिक कार्यकर्ते भारतभूषण आबा बराटे यांच्याकडून स्वखर्चाने सुरू करण्यात आले आहे. हा रस्ता होत असल्याने या परिसरातील नागरिकांकडून आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे.
गोकुळनगर पठार-सहयोगनगर येथील १.५ किलोमीटरचा रस्ता होत नसल्याने येथील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. पावसाळ्यात तर जीव मुठीत धरून लोकांना ये जा करावे लगत होते. या भागातील नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी हा रस्ता करून देईल असे वचन भारतभूषण आबा बराटे यांनी दिले होते त्या वचनाची वचनपूर्ती त्यांनी केल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
आज रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर स्थानिक नागरिक विशेष महिला वर्गाला आपले आनंदाश्रू रोखता आले नाहीत. काम सुरू होताच नागरिकांनी एकच जल्लोष केला. अनेक वर्षांची आमची समस्या सुटली. आता आमचे जीवन सुकर होईल अशा भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केल्या.
मला नुसती आश्वासनं देऊन जनतेला खेळवत ठेवणं कधीच आवडलं नाही. एखाद्या ठराविक परिसरातच विकासकामे करून त्याचा गाजावाजा करणे हे तर मला अजिबात मान्य नाही. म्हणूनच गेली २० वर्षांपासून रखडलेला गोकुळनगर पठार-सहयोगनगर येथील १.५ किलोमीटरचा रस्ता मी स्वखर्चाने करून देत आहे. हा रस्ता पूर्णपणे काँक्रीटचा असेल आणि त्यावर जवळपास ३० पथदिवे देखील असतील असे भारतभूषण आबा बराटे यांनी सांगितले आहे.




