
पुणे : आयुर्वेद शिक्षण मंडळाचे संस्थापक, स्वातंत्र्यसैनिक कै. वैद्यराज हरिभाऊ परांजपे यांच्या ३७ व्या स्मृतिदिनानिमित्त मंडळातर्फे १७० रुग्णांना मोफत औषध वाटप आणि ७० जणांची मोफत नेत्रतपासणी करण्यात आली.
मंडळातर्फे ३७ वे आरोग्य प्रदर्शन मोफत रोगनिदान चिकीत्सा असा उपक्रम दि. १७ ते २० नोव्हेंबर राबविण्यात आला. मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल बहिरट यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. मंडळाचे सचिव डॉ.मधुकर परांजपे, प्रा.डॉ. सतीश डुंबरे, डॉ.मीरा परांजपे, डॉ.हेमलता जालगांवकर, डॉ.विष्णुदत्त आगरवाल आदी उपस्थित होते.










