कोथरुड

रामनदीच्या पुनरुज्जीवनासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार- चंद्रकांत पाटील यांचा निर्धार

कोथरूड : कोथरूड मतदारसंघातून वाहणाऱ्या रामनदीच्या (ramnadi) पुनरुज्जीवनासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार, असा निर्धार भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे‌ आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. रामनदीच्या पुनरुज्जीवनासाठी काम करणाऱ्या वसुंधरा स्वच्छता अभियान, किर्लोस्कर वसुंधरा, जीवित नदी, इकॉलॉजिकल सोसायटी आदी १५ वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थेसोबत कोथरूडमधील बैठकीत ते बोलत होते.(We will do our best for the revival of Ramnadi – the decision of Chandrakant Patil)

यावेळी पुणे शहर संघटन सचिव राजेश पांडे, योगेश गोगावले, कोथरूड मंडलाचे अध्यक्ष पुनित जोशी,  विरेन चित्राव (किर्लोस्कर वसुंधरा), डॉ. गुरुदास नुलकर (इकॉलॉजिकल सोसायटी), अनिल गायकवाड (वसुंधरा स्वच्छता अभियान), शैलेजा देशपांडे (जीवित नदी), डॉ. सचिन पुणेकर (बायोफिअर), विनोद बोधनकर (सागर मित्र), शैलेंद्र पटेल (जलदेवता अभियान) आदींसह एकूण १५ स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

IMG 20210116 WA0007

पुण्यातील भुगावमध्ये उगम पावणाऱ्या रामनदीवर अतिक्रमण आणि जलप्रदूषणाचा विळखा पडला आहे. त्यामुळे याचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे असून, यासंदर्भात काम करणाऱ्या १५ स्वयंसेवी संस्थेसोबत आज कोथरूडमध्ये बैठक झाली. या बैठकीवेळी संस्थेने रामनदीच्या पुनरुज्जीवनासाठी उपाययोजना आणि प्रशासकीय सहकार्याबद्दल सादरीकरण केले. तसेच आजपर्यंत केलेल्या कामाची माहिती दिली.

यानंतर रामनदीच्या पुनरुज्जीवनावर बोलताना पाटील म्हणाले की, “रामनदीचे पुनर्जीवन काळाची गरज आहे. यासाठी प्रशासकीय पातळीवर मी स्वतः प्रयत्न करेन. जिल्हाधिकाऱ्यांशी पाठपुरावा करुन यासाठी प्राधिकरणाची स्थापना करु. तसेच, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासोबत पत्रव्यवहार करुन रामनदीच्या पुनर्जीवनासाठी भरीव निधी उपलब्ध करून देऊ. त्यासोबतच नदीच्या पुनर्जीवनासाठी आमदार निधीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देऊ. तसेच महापालिका आयुक्तांसोबत या विषयावर बैठक घेऊन उपाययोजना करु” असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये
Close
Close