राजकीय

नवनीत राणा यांनी युसूफ लकडावालांकडून कर्ज घेतलं, ED चौकशी करणार का? : संजय राऊत

पुणे : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नवनीत राणा यांनी युसूफ लकडावाला यांच्याकडून 80 लाखांचं कर्ज घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे. युसूफ लकडावाला हे नाव अंडरवर्ल्डशी संबंधित आहे. हा प्रश्न राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असून ईडी आता त्याची चौकशी करणार का असा सवालही त्यांनी केला आहे. 

नवनीत राणा यांनी डी गँगशी संबंधित हे नाव असून त्याच्याकडून राणांनी हे 80 लाखांचं कर्ज घेतल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी नवनीत राणांचे एक अॅफिडेव्हीट शेअर केलं असून त्यामध्ये नवनीत राणा यांनी युसूफ लकडावाला याच्याकडून 80 लाख रुपयांचं कर्ज घेतल्याचं स्पष्ट दिसतंय. हा मुद्दा आता राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असून ईडी या प्रकरणाचा तपास करणार का असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. 

Img 20220425 wa00102978251768482543832

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये