पुणे शहर

वारजेतील बारटक्के दवाखान्यात लवकरच सुरू होणार डायलेसिस सेंटर : दिपाली धुमाळ यांच्या प्रयत्नांना यश..

एक्सरे व सोनोग्राफीची सुविधाही होणार उपलब्ध

वारजे : pune city, Warje सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी वारजे माळवाडी मधील पुणे महानगरपालिकेच्या कै. अरविंद बारटक्के दवाखान्यात डायलेसीस सेंटर, एक्सरे व सोनोग्राफीची सुविधा चालू व्हावी यासाठी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांच्याकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले असून लवकरच वरील सुविधा बारटक्के दवाखान्यात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. Dialysis center soon at Baratakke Hospital in Warje: Deepali Dhumal’s efforts succeed

याबाबत माहिती देताना धुमाळ यांनी सांगितले की, बारटक्के दवाखान्यात दहा डायलेसीस बेड्सची व्यवस्था करण्यात येणार आहे. या सुविधेमुळे वारजे कर्वेनगर, शिवणे, उत्तमनगर, कोंढवा कोपरे -धावडे तसेच कोथरूड व परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना शासकीय नियमानुसार अतिशय कमी शुल्क आकारून ही सुविधा उपलब्ध होणार आहे.

त्याचबरोबर एक्सरे व सोनोग्राफी ची सुध्दा व्यवस्था करण्यात येणार आहे. या डायलेसीस सेंटरचा लोकार्पण सोहळा लवकरच करण्यात येणार असून नागरिकांना या सुविधेसाठी पुणे शहरात लांबच्या ठिकाणी अथवा खाजगी दवाखान्यात मोठ्या प्रमाणात शुल्क देऊन जावे लागणार नाही. या उपक्रमामुळे सर्वसामान्य व गोरगरीब नागरिकांना या केंद्राचा मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे. हे केंद्र सुरू झाल्यानंतर याच दवाखान्यात महानगरपालिकेच्या माध्यमातून सिटी स्कॅन मशिनची व्यवस्था देखील केली जाणार आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने माझ्या सारख्या सर्वसामान्य नगरसेविकेला विरोधीपक्ष नेते पदाची जबाबदारी देऊन माझ्यावर विश्वास दाखवला, त्यानुसार माझी नैतिक जबाबदारी म्हणून मी माझ्या प्रभागातील व परिसरातील  नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे, त्यांना चांगले उपचार मिळावेत, आरोग्याच्या सर्व सुविधा आपल्याच भागात त्यांना उपलब्ध व्हाव्यात याच उद्देशाने या दवाखान्यात डायलेसीस बेड्स, एक्सरे, सोनोग्राफी केंद्र सुरू करण्यासाठी मी करत असलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. सदर उपक्रमासाठी राष्ट्रवादी पक्षाच्या नेतेमंडळींच्या सहकार्याने व पुणे महानगरपालिकेने भरीव निधी उपलब्ध करून दिल्याने वरजेतील नागरीकांना चांगल्या आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होणार असल्याचे दिपाली धुमाळ यांनी सांगितले.

Screenshot 2021 09 20 19 02 53 50

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये