महाराष्ट्र

शिवाजीराव आढळराव पाटलांची शिवसेनेतून हकालपट्टी

मुंबई : पक्षविरोधी काम केल्याचा शिरुर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार  शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil)  यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे गटासोबत सामील झाल्यानं त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अभिनेते अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांचा पराभव केला. हा पराभव आढळराव पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानला गेला.

शिवसेनेचे उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सोशल मीडियावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या होत्या. यामध्ये त्यांनी ‘गर्जत राहील आवाज हिंदुत्वाचा अभिनंदन मुख्यमंत्री साहेब’ असं म्हटलं आहे. तसेच या पोस्टमध्ये आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कुठेही फोटो टाकला नाही.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये