पुणे शहर

PUNE : सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे 14 फेब्रुवारीला राज्यपालांच्या हस्ते अनावरण

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) साकारण्यात आलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सोमवार दि. 14 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 11 वाजता अनावरण करण्यात येणार आहे.

Fb img 1644220341934

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत.

Img 20220206 wa00011502175928892672051

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पाठपुराव्यातून व मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात येत आहे. या पुतळ्याचे अनावरण सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने दि. 3 जानेवारी 2021 रोजी करण्यात येणार होते. मात्र कोरोनाचा प्रभाव अधिक वाढल्याने कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. हा पुतळा व परिसरातील सुशोभिकरण पूर्णत्वास आले असून सोमवार दि. 14 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 11 वाजता या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये