पुणे शहर

फ्लेक्सवरील चुकांमुळे भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक ट्रोल ; मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात आंदोलन

पुणे : दहशतवादी दाऊद इब्राहीमला देशद्रोही कृत्य करण्यासाठी अर्थ पुरवठा केल्याच्या आरोपावरून  ईडीने अटक केलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांची मंत्रिमंडळातून तातडीने हकालपट्टी करावी अशी मागणी शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली. मात्र आंदोलन करताना मुळीक आणि भाजप कार्यकर्ते यांनी हातात धरलेल्या निषेध फलकावर अनेक चुका झाल्याने भाजप शहराध्यक्ष यांना नेटकरी मोठ्या प्रमाणावर ट्रोल करीत आहेत.

मुळीक यांच्या नेतृत्वाखाली आज पुण्यात शहर भाजपच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी मुळीक बोलत होते. संघटन सरचिटणीस राजेश पांडे, सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, संदीप लोणकर, दत्ता खाडे, दीपक नागपुरे, अर्चना पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुळीक म्हणाले,  दाऊद इब्राहिमने मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणले. वेळोवेळी दहशतवादी कृत्यांना पाठबळ दिले. त्याच्याशी मलिक यांचे आर्थिक व्यवहार आहेत. हा देशद्रोह आहे. अशा व्यक्तीस मंत्रिपदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यांची हकालपट्टी होत नाही तोपर्यंत भाजपा तीव्र आंदोलन करणार आहे.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये