पुणे शहर
पौड रस्त्यावरील शिवशक्ती मित्र मंडळाने यंदा ‘स्वराज्या कडून सुराज्या कडे’ हा जिवंत देखावा सादर केला आहे.

पुणे : कोथरूड मधील पौड रस्त्यावरील शेलार कॉम्पेक्स येथील शिवशक्ती मित्र मंडळाने ‘स्वराज्या कडून सुराज्या कडे’ हा जिवंत देखावा सादर केला आहे.
मुद्रा प्रॉडक्शन ने सादर केलेल्या या देखाव्याची संकल्पना मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची आहे.मंडळाने या वर्षी ३९व्या वर्षात यशस्वी पदार्पण केले आहे.
मंडळाचे अध्यक्ष मोहन मंत्रे, उपाध्यक्ष राजेश कोंढे, कार्याध्यक्ष महेंद्र सणस, कार्यकर्ते शिवदास मांढरे, गणेश गोळे, नितीन सणस, सचिन घोडके, श्रीकांत शिंदे, किशोर पंडित अमित शिंदे यांचं खुप मोलाचं सहकार्य लाभले.



















