पुणे शहर

रविवारी ८ जूनला वेळ काढा.. ‘गोष्ट इथे संपत नाही’ शिवराज्याभिषेक कार्यक्रमाचे कोथरुडकरांसाठी मोफत आयोजन

कोथरूड : शिवगर्जना प्रतिष्ठान ट्रस्ट यांच्या वतीने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास सांगणाऱ्या ‘गोष्ट इथे संपत नाही’- शिवराज्याभिषेक या विशेष कार्यक्रमाचे आयोजन कोथरुडकरांसाठी मोफत करण्यात आले असल्याची माहिती शिवगर्जना प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अमित तोरडमल यांनी दिली.

रविवार दिनांक ८ जून २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता कोथरूड मधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात गोष्ट इथं संपत नाहीचा शिवराज्याभिषेक भागाचे सादरीकरण होणार आहे. यावेळी केंद्रीय हवाई उड्डाण व सहकार राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष रघुजी राजे आंग्रे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संभाजी भागाचे संघचालक अनिल व्यास, एव्हरेस्ट वीर भूषण हर्षे यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास विविध भागात ‘गोष्ट इथे संपत नाही’ या कार्यक्रमात सादर केला जातो. सारंग भोईरकर आणि सारंग मांडके हे दोघे महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास अशा पद्धतीने मांडतात की उपस्थित प्रेक्षक भरवून जातात. बऱ्याच वेळा इतिहासातील काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात त्याही आपल्यासमोर येतात. एकूणच या कार्यक्रमाने सध्या इतिहास प्रेमींच्या, शिवप्रेमींच्या मनात घर केले आहे. त्यामुळे कोथरुडकरांनीही शिवराज्याभिषेकवरील गोष्ट इथे संपत नाही हा मोफत कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अमित तोरडमल यांनी केले आहे.

Screenshot 20250508 083342 samsungnotes1092093488754539978
Img 20250605 wa00379105313236098782356
Img 20240404 wa0013282295463184266198901191

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये