विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमानिमित्त पुणे-नगर महामार्गावरील वाहतुकीत तात्पुरता बदल..

पुणे : पेरणे फाटा येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमा निमित्त 31 जानेवारी 2021 सायंकाळी सात वाजल्या पासून ते 1 जानेवारी 2022 रात्री बारा वाजेपर्यंत पुणे अहमदनगर महामार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. पुणे शहर वाहतूक विभागाचे उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी याबाबत आदेश काढला आहे.
याशिवाय अभिवादनासाठी येणाऱ्या नागरीकांसाठी विविध ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक 29 तासासाठी वळविण्यात येणार आहे. पुण्याहून नगरकडे जाणारी जड वाहतूक खराडी बाह्यवळणमार्गे केडगाव – चौफुल – न्हावरा – शिरूरमार्गे नगरकडे वळविण्यात येणार आहे.
सोलापूरहुन चाकणकडे जाणारी वाहतूक खराडी बाह्यवळणमार्गे विश्रांतवाडी – आळंदी – चाकणमार्गे वळविण्यात येणार आहे. मुंबईहून नगरकडे जाणारी जड वाहतूक वडगाव मावळ – चाकण – खेड – मंचर – नारायणगाव-आळेफाटा – नगरकडे जाणार आहे. मुंबईहुन नगरकडे जाणारी जड वाहने चाकण – खेड – पाबळ – शिरूर मार्गे नगर येथे वळविण्यात येणार आहेत.




