पुणे शहर

कोथरूड मधील गुजरात कॉलनीतील होळी पौर्णिमेचा सण म्हणजे परंपरा आणि सामाजिक जाणीव यांचा संगम..

कोथरुड : कोथरुड मधील गुजरात कॉलनीतील वर्धमान प्रेस चौक येथे बाल प्रतिष्ठान वतीने साजरा केला जाणारा होळी पौर्णिमेचा सण म्हणजे परंपरा आणि सामाजिक जाणिवेचा संगम असल्याचे म्हणावे लागेल. या ठिकाणी मोठ्या उत्साहात गेली ३२ वर्षापासून होळी पौर्णिमेचा सण साजरा करण्यात येत आहे. 

Img 20260222 wa0006669826703895141779

यंदाही हा सण साजरा करत असताना होळीच्या पवित्र अग्निमध्ये अहंकार, निराशा, दारिद्र्य, आळस, द्वेष, यांचे दहन होवो आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख,  समाधान, उत्तम आरोग्य अणि शांती नांदो अशी प्रार्थना होळीचे मुख्य संयोजक प्रीतम मेहता यांनी केली.

होळी पर्यावरण पूरक होण्यासाठी लहान होळी करण्यात आली होती,  त्यामुळे कमीतकमी वृक्षतोड होऊन पर्यावरणाची हानी कमी होण्यास मदत होणार आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी होळी माध्यमातून सामाजिक संदेश देण्याची परंपरा यंदाच्या वर्षीही कायम राखण्यात आली, होळी मध्ये पोळीचा नैवैद्य टाकल्याने तो जळून नष्ट होतो त्याऐवजी तो नैवेद्य गरीब लोकांना दिल्यास  त्यांनाही आपल्या आनंदात सामावून घेता येईल म्हणून यावेळी “लहान करू होळी – दान करू पोळी” असा सामाजिक संदेश बाल प्रतिष्ठान च्या वतीने देण्यात आल्याची माहिती मुख्य संयोजक प्रीतम मेहता यांनी दिली.

यावेळी गुजरात कॉलनी परिसरातील अनेक मान्यवर नागरिक तसेच अबाल वृद्ध व  महिला यांची उपस्थिती लक्षणीय होती.
प्रीतम मेहता, राजेंद्र तोटे, विपुल होवाळे, प्रणय मेहता, अमर मांढरे, राहुल खत्री, रुद्र सोनेकर, युवराज खत्री, अनिल मांढरे, श्रीमती ज्योती मेहता, शोभा खत्री, गायत्री तोटे, शर्मीली सोनेकर आदी उपस्थित होते.

Fb img 17722786558115856474783028037709

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये