कोथरूड, कर्वेनगर, वारजे, एरंडवणे आणि बावधन भागातील अशा आहेत प्रभागरचना; या काही प्रभागात येतील हरकती…

पुणे : बऱ्याच प्रतीक्षेनंतर आज पुणे महानगरपालिका निवडणूक 2022 साठीची प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. आज प्रभागरचना जाहीर होणार असल्याने सर्वच राजकीय नेते व कार्यकर्त्यांच्या मनात याबाबत उत्सुकता होती. प्रभाग कसे तयार करण्यात आले आहेत याबाबतचा अंदाज या अगोदरच राजकीय वर्तुळात चर्चिला गेला होता व त्याला अनुसरूनच काही प्रमाणात प्रभागांची रचना झाल्याचे दिसून येत आहे. काही प्रभागांची रचना मात्र सर्वांनाच अनपेक्षित झाली असल्याने या प्रभागांच्या रचनांबाबत मोठ्या प्रमाणात हरकती येण्याची शक्यता आहे.
काल 31 जानेवारी रोजी प्रभाग रचना ची नावे पुढे आल्यानंतर एकंदरीतच प्रभाग कसे होतील याचा अंदाज आला होता पण प्रत्यक्ष प्रभागांची रचना आज जाहीर झाल्यानंतर अनेकांना धक्के बसले आहेत. त्यामुळे प्रभाग क्रमांक ३५ रामनगर, उत्तमनगर, शिवणे, प्रभाग क्रमांक ३३ बावधन खुर्द – महात्मा सोसायटी, प्रभाग ३२ भुसारी कॉलनी – सुतारदरा या प्रभागात हरकती घेण्याची तयारी राजकीय पदाधिकाऱ्यांकडून सुरू करण्यात आली आहे.
असे आहेत प्रभाग
प्रभाग क्रमांक ३६ कर्वेनगर
मतदार संख्या ६७२६०
प्रभाग क्रमांक 36 कर्वेनगर हा आंबेडकर चौक येथील वारजे जलशुद्धीकरण केंद्रापासून सुरु होऊन पुढे हिंगणे होम कॉलनी वडार वस्ती मिलेनियम स्कूल वनदेवी मंदिर समोरून कामना वसाहत पुणे कॅनल रोडने मीनल कॉर्नर श्रीमान सोसायटी पानंद रोड दाते मंडवाले पासून नदीकडे व मध्ये कडेच्या रस्त्याने कॉलनी दुधानेनगर भालेकर वस्ती इंगळेनगर तपोधाम असा या प्रभगाचा भाग आहे. 2017 च्या प्रभाग क्रमांक 31 मधून या प्रभागाची निर्मिती करण्यात आली असून जुन्या प्रभागातील बराचसा भाग या नवीन प्रभाग क्रमांक 36 मध्ये आलेला आहे.

प्रभाग क्रमांक ३४ वारजे – कोंढवे धावडे
मतदार संख्या ६४९१९
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील डुक्कर खिंडी पासून वारजे कडे येताना महामार्गाला लागून असलेल्या डाव्या बाजूच्या सोसायट्या, उरीटनगर, सिप्ला फाऊंडेशन, माई मंगेशकर, वारजे पोलीस स्टेशन एनडीए रस्त्याने संजीवन हॉस्पिटल, कोंढवे धावडे रस्त्याची उजवी बाजू , माळवाडी, अतुलनगर, पॉप्युलरनगर, असा हा भाग या प्रभागात आहे.



प्रभाग ३५
रामनगर उत्तमनगर, शिवणे
मतदार संख्या ६७४२२
प्रभाग क्रमांक ३५ रामनगर उत्तमनगर, शिवणे हा प्रभाग डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक तिरुपतीनगर आकशनगर, सिध्देश्वर नगर, सिप्ला फाऊंडेशन वारजे पोलीस स्टेशन, वारजेगाव, खान वस्ती, अहिरे गाव, दांगट पाटील नगर, शिवणे, उत्तमनगर कडे जाताना एनडीए रस्त्याची डावी बाजू या प्रभागात समाविष्ट करण्यात आली आहे.



प्रभाग क्रमांक ३३
बावधन खुर्द , महात्मा
मतदार संख्या ६६२१६
प्रभाग ३३ बावधन खुर्द, डहाणूकर कॉलनी या प्रभागात बावधन व कोथरुड मधील महात्मा सोसायटी, डहाणूकर कॉलनी, आयडीएल सोसायटीचा भाग घेऊन तयार करण्यात आला आहे. हा प्रभाग बावधन मधील एचडीएफसी बँक बावधन वृद्ध पाटील नगर प्लॅनेट नाईन बिस्त्रो भुसारी कॉलनीतील लोहिया जैन आयटी पार्क सोसायटी सोसायटी सहजानंद डहाणूकर कॉलनी, आयडीएल व मयूर कॉलनीचा काही भाग कर्वेनगर मधील गोसावी वस्ती, हॅप्पी कॉलनी या भागांचा या प्रभागात समाविष्ट करण्यात आला आहे.



प्रभाग क्रमांक १६ -एरंडवणे
मतदार संख्या – ६७१०३
महालक्ष्मी मंगल कार्यालय राजाराम पूल ते संभाजी उद्यान डेक्कन , बालगंधर्व चौक- घोले रस्ता मार्गे ज्ञानेश्वर पादुका चौक फर्ग्युसन कॉलेज – बालभारती – लॉ कॉलेज रस्ता मार्गे नळस्टॉप कर्वे रस्ता मार्गे एसएनडीटी चौक- कॅनल रस्त्याची डावी बाजू पांडुरंग कॉलनी -करिष्मा चौक, अलंकार पोलीस चौकी , ताथवडे उद्यान कर्वेनगर हा भाग या प्रभागात घेण्यात आला आहे.



प्रभाग क्रमांक ३१
कोथरुड गावठाण – शिवतीर्थावर
मतदार संख्या ६११५
कर्वे पुतळा चौक, जलसंपदा भवन, नाल्याची लाईन गणंजय सोसायटी, गांधी भवन, कुमार परिसर डीपी रोड उजवी बाजू, आशिष गार्डन चौक, कोथरूड पोलीस स्टेशन, सह्याद्री हॉस्पिटल किनारा हॉटेल पासून आत जीत ग्राउंड वरती परमहंसनगर रस्ता उजवी बाजू, पेठकर साम्राज्य, शिवतीर्थनगर ते पौड रस्ता डावी बाजू, प्रतिक नगर कॅनॉल थोरात उद्यान असा हा प्रभाग आहे. यामध्ये गुजरात कॉलनी शिवतीर्थनगर, कोथरूड गावठाण, राहुलनगर श्रीराम पार्क, शिवतारा सोसायटी, मंत्री पार्क तेजसनगर असा भाग या प्रभागात समाविष्ट करण्यात आला आहे.



प्रभाग क्रमांक -३०
जयभवानीनगर – केळेवाडी
मतदार संख्या- ६०२३७
एआरआय टेकडी- हनुमान नगर -केळेवाडी,रामबाग कॉलनी एम आय टी कॉलेज रोड,लीला पार्क- सुनिता पार्क -शिवतीर्थ नगर गणपती मंदिर -रोहन कॉर्नर एलआयसी कॉलनी जय भवानी नगर शीला विहार कॉलनी- अद्वैत नगर ,भीम नगर, टिळेकर प्लॉट- कासल पेट्रोल पंप देशपांडे पूरम- मेगासिटी



प्रभाग क्रमांक १४
पाषाण बावधन बुद्रुक
मतदार संख्या ५८५१५
प्रभाग क्रमांक १४ पाषाण बावधन बुद्रुक या प्रभागात बावधान बुद्रुक गाव पूर्ण व बावधान खुर्द चा काही भाग,
बाणेर पाषाण लिंक रोडचा काही भाग, सोमेश्वरवाडी, लमान तांडा, सुतारवाडी पूर्ण, रामनगर, एआरडीइची हद्द, असा भाग या प्रभागात समाविष्ट करण्यात आला आहे.



प्रभाग क्रमांक -३२
भुसारी कॉलनी – सुतारदरा
मतदार संख्या- ६७१२७
भुसारी कॉलनी -लोहिया जैनआयटी पार्क, भीमसेन जोशी उद्यान, काशीकापडी पुरम, रुणवाल, शिवनगरी जवळून आशिष गार्डन चौक -शास्त्रीनगर पोलीस चौकी ,किनारा हॉटेल चौक, जित ग्राऊंडच्या अलीकडील बाजू परमहंस नगर – म्हातोबा नगर लोकमान्य वस्ती – सुतारदरा









