या भ्रष्टाचाऱ्यांना आता जनतेच्या न्यायालयातच शिक्षा होऊ शकेल : अमित ठाकरे

मुंबई : रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवरून राजकारण तापताना दिसत आहे. या मुद्द्यावरून आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे आक्रमक झाले असून त्यांनी या प्रकाराबाबत कडक शब्दात रोष व्यक्त केला आहे. These corrupt people can now be punished only in the people’s court: Amit Thackeray
मुंबई बरोबरच राज्यातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. यावर फेस बुक पोस्ट करत अमित ठाकरे यांनी म्हंटले आहे की, रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांमुळे होणारे ट्रॅफिक जॅम, अपघात, वाया जाणारे इंधन या गोष्टींमुळे अगदी सर्वांचंच कंबरडं मोडलंय, पण सत्ताधारी राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या भ्रष्टाचारी आघाडीला त्याच्याशी काही देणंघेणं नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पक्ष प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून खड्डेविरोधी आंदोलनं करतोय.
खड्डयांबाबत उच्च न्यायालयातही वारंवार खोटं बोलणाऱ्या या भ्रष्टाचाऱ्यांना आता जनतेच्या न्यायालयातच शिक्षा होऊ शकेल अशा शब्दात त्यांनी राग व्यक्त केला आहे.




