अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अनपेक्षित राजकीय उपथापालथ.. कोणाची उमेदवारी कट तर कोणाचे पक्षांतर

राजकीय घडामोडींनी प्रभाग क्रमांक ३० व ३२ चे राजकीय वातावरण तापले..
कर्वेनगर : राजकीय घडामोडींनी प्रभाग क्रमांक ३० कर्वेनगर हिंगणे होम कॉलनी व ३२ वारजे पॉप्युलरनगर मधील राजकीय वातावरण आज ढवळून निघाले. उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी अनेक अनपेक्षित राजकीय उपथापालथ पाहायला मिळाली. कुणाची उमेदवारी कापण्यात आली तर कोणी दुसऱ्या पक्षात प्रवेश घेत उमेदवारी मिळवली. तर कोणी वेगळा पॅनल बनवला. युती, आघाडीच्या गोंधळात राजकीय समीकरणे जुळवत उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले. दाखल झालेले उमेदवारी अर्ज पाहता प्रभाग ३० कर्वेनगर हिंगणे होम कॉलनी व ३२ वारजे पॉप्युलरनगर मध्ये तुल्यबळ लढती पाहायला मिळणार आहेत.

प्रभाग 30 कर्वेनगर, हिंगणे होम कॉलनी प्रभागात आज सुरवातच राष्ट्रवादीतून आलेल्या मोठ्या अनपेक्षित बातमीने झाली. या प्रभागात राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारीसाठी महिला गटातून दावेदार असणाऱ्या तेजल दुधाने यांची उमेदवारी कापण्यात आली आणि या बातमीने राजकीय वातावरण ढवळून निघाले. कालपर्यंत उमेदवारी निश्चित मानली जात असताना काल रात्रीत घडलेल्या घडामोडींनी तेजल दुधाने यांच्या उमेदवारीवर गदा आली. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली . भाजप शिवसेना युती न झाल्याने शिवसेनेचा ही पॅनल तयार झाला आहे. त्यामुळे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस- शिवसेना- मनसे आघाडी असे चार पॅनल या प्रभागात तयार झाले आहेत. भाजपचे विनोद मोहिते यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे तर मनसेचे शैलेश जोशी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून महिला गटात पत्नी निवेदिता जोशी यांच्यासाठी उमेदवारी मिळवली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातून मनिषा विरेश शितोळे यांना उमेदवारी मिळाली आहे.
प्रभाग क्रमांक ३० मध्ये
भाजप : गट अ सुशील मेंगडे, गट ब रेश्मा संतोष बराटे, गट क तेजश्री महेश पवळे, गट ड राजाभाऊ बराटे
राष्ट्रवादी काँग्रेस : गट अ स्वप्निल दुधाने, गट ब संगीता बराटे, क गट निवेदिता शैलेश जोशी, गट ड विजय खळदकर,
शिवसेना (शिंदे) गट अ विनोद मोहिते, गट ब मानसी गुंड, गट क प्रतीक्षा जावळकर, गट ड प्रणव थोरात
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) : क गट मनिषा विरेश शितोळे,
काँग्रेस शिवसेना मनसे : गट अ मोहित बराटे, गट ब सुनिता विष्णू सलगर, गट क वैशाली दिघे, गट ड सचिन विप्र
प्रभाग क्रमांक ३२ वारजे, पॉप्युलरनगर
या प्रभागात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सरळ लढत पाहायला मिळणार आहे वर्षं वर्ष राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून या प्रभागाकडे पाहिले जाते. ह्या प्रभागाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न भाजपाकडून करण्यात आला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक फोडून भाजपने त्यांना आपल्या पक्षातून उमेदवारी दिली आहे. परंतु हे करत असताना भाजप पक्षाचे काम करणारे कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यात नाराजी पसरली आहे. भाजपच्या मतदारांमध्ये ही याबाबत चर्चा आहे. या घडामोडीत भाजपचे किरण बारटक्के यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कालच बारटक्के अजित पवार यांची भेट घेतली होती तेव्हाच ते राष्ट्रवादीत येतील असे बोलले जात होते. काँग्रेसचे सचिन बराटे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत उमेदवारी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील माजी नगरसेवक भाजपमध्ये गेल्याने पक्षाचे खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष व माजी नगरसेवक बाबा धुमाळ यांनी चांगला पॅनल बनावट बनवत भाजप समोर आव्हान उभे केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस : अ गट अश्विनी किशोर कांबळे, ब गट किरण बारटक्के, क गट दिपाली धुमाळ, ड गट सचिन बराटे
भाजप : अ गट हर्षदा भोसले, ब गट भारतभूषण बराटे, क गट सायली वांजळे, ड गट सचिन दोडके
मनसे : अ गट अनुसूचित प्रवर्ग केशर सोनवणे, ब गट गणेश धुमाळ, क गट भाग्यश्री दांगट, ड गट रियाज शेख
शिवसेना शिंदे गट : गट अ दीपाली धिवार, ड गट अजय भलशंकर
आप पक्ष : निलेश वांजळे, क गट सुरेखा भोसले
समाजवादी पक्ष : ड गट विनायक लांबे






