मालगाडीचे डब्बे रुळावरुन घसरल्याने या रेल्वेगाड्या रद्द

पुणे : मालवाहू मालगाडीचे डब्बे दौलताबाद स्टेशनजवळ रेल्वे रुळावरुन घसरल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परभणी रेल्वे स्थानकावरुन धावणार्या नऊ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यात निजामाबाद – पुणे दरम्यान धावणाऱ्या गाडीचाही समावेश आहे.
या अपघातामुळे मेन लाईन बंद झाली आहे. परभणी रेल्वे स्थानकावरुन धावणारी हैद्राबाद – औरंगाबाद गाडी परभणी ते औरंगाबाद, औरंगाबाद – हैद्राबाद गाडी औरंगाबाद ते परभणी दरम्यान, निजामाबाद – पुणे दरम्यान, मनमाड – नांदेड, रेनीगुंठा ते नांदेड दरम्यान, धर्माबाद – मनमाड, औरंगाबाद ते मनमाड दरम्यान, मनमाड – धर्माबाद गाडी मनमाड ते औरंगाबाद दरम्यान, काचिगुडा – रेनीगुंठा गाडी नांदेड ते रेनीगुंठा दरम्यान, रेनीगुंठा ते काचिगुडा गाडी पोटुल ते नांदेड दरम्यान आणि नरसापुर – नगरसोल गाडी औरंगाबाद ते नगरसोल दरम्यान रद्द करण्यात आली आहे.























































