पुण्यातील नव्या कडक निर्बंधांबाबत अत्यंत महत्त्वाचे पुणे महापालिकेचे आदेश !

पुणे : पुणे शहरातील कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता पुणे महापालिका प्रशासनाकडून पुणे शहरात नव्याने निर्बंध वाढविण्यात आले असून सर्व प्रकारच्या सांस्कृतिक, राजकीय व धार्मिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.Very important order of Pune Municipal Corporation regarding new strict restrictions in Pune!
हे आहेत अत्यंत महत्वाचे नवे आदेश
■ पुणे महानगरपालिका क्षेत्रात सर्व प्रकारचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व धार्मिक कार्यक्रमास पुढील आदेशापर्यंत संपूर्ण प्रतिबंध राहील.
■ लग्नसमारंभ कार्यक्रम ५० लोकांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी राहील.
अंत्यसंस्कार दशक्रिया व त्या निगडित कार्यक्रम २० लोकांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी राहील.
■ पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व कार्यालय (आरोग्य व अत्यावश्यक सेवा वगळून) ५० टक्के मनुष्यबळासह सुरू ठेवता येतील. शक्य असल्यास ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय निवडावा.
पुणे महानगरपालिका हद्दीत नव्याने लागू करण्यात आलेले निर्बंध !#PMCFightsCorona#पुण्याचा_निर्धार_कोरोना_हद्दपार pic.twitter.com/hzcjXLb2mj
— PMC Care (@PMCPune) March 16, 2021







