पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना पूर्ण ; उद्या निवडणूक आयोगाला सादर करणार…

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा पूर्ण झाला असून उद्या संध्याकाळी हा आराखडा राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
संपूर्ण पुणे शहरातील ५७ अधिक एक अशी प्रभाग रचना पूर्ण झाली असून उद्या संध्याकाळी राज्य निवडणूक आयोग यांना सादर केली जाणार आहे. नदी-नाले आणि मुख्य रस्ते तसेच उत्तरेकडून पूर्व नैऋत्य अशा या मार्गदर्शक सूचनेनुसार ही प्रभाग रचना असेल यात कुठलीही व्यक्ती पक्ष समोर न ठेवता मार्गदर्शक सूचनेनुसार ही रचना केली आहे.

पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी तीन सदस्यांचा एक प्रभाग राहणार आहे. कोरोनामुळे जनगणना होऊ शकलेली नाही, त्यामुळे या निवडणुकीसाठी २०११ ची लोकसंख्या ग्राह्य धरली जाणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने या १० वर्षात लोकसंख्या वाढल्याने कायद्यात बदल करून महापालिकांची सदस्य संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पुणे महापालिकेची सदस्यसंख्या १६१ वरून १७३ इतकी निश्चीत करण्यात आली आहे. ही नगरसेवकांची संख्या वाढत असल्याने प्रभागांचा आकार कमी होऊन प्रभागांची संख्या ४२ वरून ५७ इतकी
होणार आहे.



