पुणे शहर

गुरुवारी पुण्यातील या भागातील पाणीपुरवठा बंद राहणार

पुणे :  २७/०१/२०२२ रोजी वारजे जलकेंद्र, खडकवासला उपसा (रॉ वॉटर)केंद्र तसेच रायझींग मेन लाईनवर स्थापत्य, विद्युत व यांत्रिकी विषयक कामे करावयाचे असल्यामुळे त्या काळात वारजे जलकेंद्र येथील पंपींग बंद ठेवावे लागणार आहे.त्यामुळे वारजे व पाषाण जलकेंद्र व नवीन होळकर जलकेंद्र यांना होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.तरी नागरिकांनी सहकार्य करावे. असे आवाहन पुणे महापालिका प्रशासनाने केले आहे.

पाणीपुरवठा बंद असणारा भाग
वारजे जलकेंद्र :- भुसारी कॉलनी, शास्त्रीनगर, बावधन, भुगाव रोड परिसर, सूस रोड, बाणेर, बालेवाडी, पाषाण, वारजे हाय-वे परिसर,रामनगर,कर्वे रोड परिसर, एरंडवणा,कोथरुड,डेक्कन जिमखाना परिसर, जयभवानीनगर, सुतारदरा, डहाणूकर कॉलनी, परंमहंसनगर,कर्वेनगर, गांधीभवन, महात्मा सोसायटी, हिंगणे होम कॉलनी, हॅपी कॉलनी, गोसावी वस्ती, कॅनॉल रोड, वारजे जकातनाका परिसर इ. व

नवीन होळकर जलकेंद्राकडील कळस, धानोरी, विमाननगर,लोहगावपंचायत,शिवाजीनगर,भोसलेनगर,घोलेरोड,सेनापती बापट रोड, बोपोडी,खडकी,हनुमाननगर,जनवाडी,
वैदुवाडी, मॉडेल कॉलनी, वडारवाडी, रेव्हेन्यु कॉलनी, पोलीस लाईन, मुळा रोड, संगमवाडी, पाटिल
इस्टेट,भांडारकर रोड इत्यादी .दि. २८/०१/२०२२ रोजी उशीरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होईल.

Img 20220123 wa0404

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये