राजकीय
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. पवार यांनी ट्वीट करत याविषयीची माहिती दिली आहे. त्याचबरोबर संपर्कात आलेल्या सर्वांना खबरदारी घेण्याचे आणि चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.
ट्वीटमध्ये शरद पवार म्हणतात, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पण काळजीचं काही कारण नाही. मी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे. मी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती करतो की त्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी आणि खबरदारी घ्यावी.




