पुणे शहर

हरियाणा व दिल्लीमधील २२ गुन्ह्यांतील मोस्ट वाँटेड आरोपीला इराणी वस्तीमध्ये अटक; शिवाजीनगर पोलिसांची मोठी कामगिरी

हरियाणा पोलिसांच्या अटकेतून झाला होता फरार

पुणे : शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करताना हरियाणा आणि दिल्ली मधील २२ गुन्ह्यांमध्ये मोस्ट वाँटेड असलेल्या आरोपीला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. अशी माहिती शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे यांनी दिली आहे.

शनिवारी दिनांक 23/1/ 2022 रोजी ४:०० वाजताच्या दरम्यान शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना इराणी वस्ती विष्णूकृपानगर शिवाजीनगर पुणे. येथे दोन दिवसांपूर्वी शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्हयाच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करत असताना एक संशयित इसम आम्हाला पाहून पळून जाऊ लागले असता,तो इसम संशयतरीत्या पळून जाताना त्यात शिताफीने पकडून शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे आणून विचारपूस साठी ताब्यात घेण्यात आले, सदर संशयित इसमाची अधिक माहिती काढली असता त्याचे नाव १) जाफर अली खान इराणी ३० वर्ष, ईराणी वस्ती शिवाजीनगर पुणे असे नाव असून तो नुकताच कोंढवा पो. स्टे. येथील गुन्ह्यात अटक असून त्याचा जामीन झालेला आहे, तसेच तो श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु.र.नंबर ११६/२०२१ भा द वि कलम ३७९,१७० प्रमाणे दाखल गुन्ह्यात पाहिजे असले बाबत माहिती प्राप्त झाली, तसेच हरियाणा व दिल्ली येथे मोस्ट वॉन्टेड असून तो एकूण २२ गुन्ह्यांमध्ये पाहिजे असल्याबाबत माहिती मिळाली.

त्यापैकी हिसार पोलीस स्टेशन हरियाणा गुन्हा रजिस्टर नंबर 490/2021भा दवि कलम 379,420,170,120 ब,34 सदर गुन्ह्यात त्याने १ किलो सोने (४५,००,०००/-रुपये) कस्टम आधिकारी असल्याची बतावणी करून चोरी केली आहे, हिसार पोलीस स्टेशन यांनी नमूद दाखल गुन्ह्यात आरोपी नामे जाफर अलि खान इराणी यास अटक केले होते, तेव्हा तो त्यांचे अटकेतून पळून गेला होता त्यावरून हिसार पोलीस स्टेशन चे ७ पोलीस निलंबित केले होते, सदरच्या गुन्ह्यात हरियाणा राज्याचे माननीय. आय. जी. पी. सर कॉर्डीनेट करत आहेत, सदर आरोपी हा श्रीगोंदा पोलीस स्टेशन यांचे ताब्यात दिला आहे.

सदरची कारवाई ही मा. प्रियांका नारनवरे पोलीस उपायुक्त परिमंडळ -1 पुणे शहर , नारायण शिरगावंकर सहाय्यक पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे ,विक्रम गौड पोलीस निरीक्षक (गुन्हे) ,सहायक पोलीस निरीक्षक उत्तम माने ,पोलिस उप निरिक्षक भैरवनाथ शेळके, पोलिस उपनिरिक्षक विनोद महागडे ,पोलीस उप निरीक्षक विजय पानकर पो.हवा.बशीर सय्यद पोलीस,पोलीस नाईक इनामदार, अंमलदार राहुल होळकर, पोलीस अंमलदार अनिकेत भिंगारे ,पोलीस अंमलदार माने ,पोलीस अंमलदार कोल्हे, पोलीस अंमलदार पुंडे यांनी केली आहे.



Img 20220123 wa0404

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये