आरोग्य

अँटेरियर नी पेन नक्की काय आजार आहे.. लक्षणे, निदान आणि उपचार घ्या जाणून

अँटेरियर नी पेन Anterior Knee Pain एक नवीन आणि खूप प्रमाणात दिसून येणारे गुडघे दुखीचे कारण ठरत आहे. येरवी वयोमानानुसार येणारी गुडघे दुखी हे हल्लीच्या काळात कमी वयोगटातील स्त्री पुरुष दिसून येत आहे. अँटीरियर नी पेन ही तर तसे बघितले तर गुडघे दुखीची सुरुवात समजली जाते.

४० वयोगटातील लोकांना ह्या अँटीरियर नी पेन ने ग्रासले असल्याचे सध्याचे चित्र आहे. अँटीरियर नी पेन म्हणजे गुडघ्याच्या समोरील भागात सतत वेदना ,सतत दुखणे, समोरील बाजूला सूज येणे. अशी लक्षणे दिसून येतात. याची कारणे बघितली तर वाढलेले वजन, मधुमेह, उच्चरक्तदाब, थायरॉइड लवकर मासिक पाळी बंद होणे, जन्मतः पायात गुडघ्यात बाक असणे, दोन्ही गुडघे जवळ आणि घोटे लांब असणे, मांडतील स्नायू कमजोर असणे त्यामुळे गुडघ्याच्या वाटीवर ताण येणे, गुडघ्याची वाटी मांडीतील हाडावर दाबली जाणे घासणे जाणे,
जन्मत: पाय मध्ये गॅप असणे, पाय सपाट असणे फ्लॅट फिट असणे, पायातील पादत्राणे हलक्या क्वालिटी ची वापरणे अशी कारणे दिसून येतात.

Screenshot 20250508 083342 samsungnotes1092093488754539978

लक्षणे
सतत आणि नेहमी गुडघ्याच्या समोरील बाजूला दुखत राहणे, कधी वाटी च्या वर तर कधी वाटीच्या खाली दुखणे,गुडघ्यावर सूज असणे, जिना चढउतार करताना त्रास होणे, मांडी घालून जास्त वेळ बसता न येणे, भारतीय शौचालय चा वापर करताना वेदना होणे, जास्त वेळ जमिनीवर काही काम साठी बसावे लागते तर उठताना त्रास होणे, आधार घेऊन जमिनीवरून उठणे,
वारंवार वेदना शामक औषधे घ्यावी लागणे, चालणे कमी होणे, चालताना स्पीड कमी होणे, गुडघ्याच्या आतून कट कट आवाज येणे अशी लक्षणे अँटीरियर नी पेनमध्ये दिसून येतात..

Img 20250605 wa00379105313236098782356

निदान
पेशेंट ची लक्षणे आणि क्लिनिकल तपासणी केली असता ह्या आजाराबद्दल निदान करता येते  काही पेशंट मध्ये एक्सरेज  गरजे नुसार  एमआरआय, काही पेशेंट मध्ये कार्टिलॉग्राम तपासणी केली जाते.  गरजेनुसार  डिजिटल स्कॅनोग्राम विथ बायोमेट्रीक एंगल तपासणी केली जाते. लवकर तपासणी लवकर उपचार केले तर निश्चित लवकर नी पेन कमी होण्यास मदत होते आणि भविष्यात नी चे आयुष्य वाढू शकते.

काही पेशंट मध्ये विटामिन डी विटामिन B१२ ची कमतरता अँटीरियर नी पेन साठी कारणीभूत ठरू शकते.

Img 20250606 wa02987731970477298219299

उपचार

लवकर निदान ,मेडिसिन , वजन कमी करण्यासाठी फायदेशीर एक्सरसाइजेस, योग्य चांगली पादत्राणे वापरणे,
शुगर कंट्रोल करण्यासाठी योग्य व्यायाम आणि संतुलित आहार घेणे, मांडीतील स्नायू बळकट करण्यासाठी योग्य प्रमाणात व्यायाम करणे, गरजेनुसार फिजियोथेरपी ही मदत घेणे..

डॉ सचिन नागापूरकर
अस्थी रोग आणि कृत्रिम संधारोपण तज्ञ
पुणे

Img 20240404 wa0013282295463184266198901191

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये