आरोग्य

गुजरातमध्ये ‘चांदीपुरा व्हायरस’ची दहशत; 15 जणांचा मृत्यू, 27 रूग्ण, जाणून घ्या लक्षणे व उपाय

अहमदाबाद : गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसमुळे आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. गुजरातमधील 10 हून अधिक जिल्ह्यांमध्ये हा व्हायरस पसरला आहे. राज्यातील संशयित रुग्णांची संख्या २९ वर पोहोचली आहे. अचानक जास्त ताप येणे, उलट्या, जुलाब, चक्कर येणे, डोकेदुखी, फीट येणे, मेंदूला सूज येणं ही त्याची लक्षणे आहेत. या व्हायरसची लागण झालेली मुलं लक्षणं दिसल्यानंतर ४८ ते ७२ तासांच्या आत मृत्यू पावत असल्याचे सांगितले जाते आहे.

चांदीपुरा व्हायरस एन्सेफलायटीससारख्या आजाराशी संबंधित आहे. या विषाणूमुळे ताप येतो ज्यामध्ये फ्लूसारखीच लक्षणे असतात. पण त्यामुळे मेंदूला सूज (एंसेफलायटीस) देखील येऊ शकते. हा आजार डासांमुळे पसरत असल्याचे सांगितले जाते. ‘द हिंदू’च्या माहितीनुसार, 2003-2004 दरम्यान मध्य भारतात झालेल्या उद्रेकात, आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्ये एन्सेफलायटीसच्या लक्षणांमुळे 56-75% टक्के मृत्यू झाले होते.

स्वच्छतेची काळजी आवश्यक

चांदीपुरा व्हायरसची लागण होऊ नये यासाठी आजूबाजूला स्वच्छता ठेवा आणि घाण साचू देऊ नका. कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावा आणि तो उघड्यावर ठेवू नका. शौचालयाचा वापर करा आणि उघड्यावर शौच करू नका. डास, माश्या आणि कीटक होऊ नयेत याची काळजी घ्या. लहान मुलांनी डासांपासून बचावासाठी फुल स्लीव्हज कपडे घालावेत. मच्छरदाणी वापरा. मॉस्किटो रिपेलेंटचा वापर करा. आरोग्यविषयक समस्या जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या, अशा सूचना आरोग्य यंत्रणांकडून नागरिकांना करण्यात येत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये